कोल्हापूर : राज्यातील पानपट्टीचालकांनी विविध मागण्यांसाठी सोमवारी मुंबईत आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो पानपट्टीचालकांनी सहभाग घेतला. जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अरुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली पानपट्टीचालक मोर्चाला गेले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तंबाखूजन्य वस्तू व खाद्य वस्तू (पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस् आदी) एकाच ठिकाणी विकण्यास परवानगी देऊ नये, तसेच तंबाखूजन्य वस्तूंच्या विक्रीसाठी स्वतंत्र परवाना प्रणाली लागू करावी, अशा लेखी सूचना राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या. या सूचनेचा विपरित परिणाम शहरासह ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या दुकानदारांवर/किरकोळ विक्रेत्यांवर होणार आहे. शिवाय तंबाखूजन्य वस्तूच्या दुकानातून पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस्, चिप्स, कोल्ड्रिंग्ज आदी वस्तूंच्या विक्रीस प्रतिबंध केल्यास त्यांना केवळ तंबाखू व तंबाखूजन्य वस्तुंच्या विक्रीतून मिळणाºया उत्पन्नावर अवलंबून राहावे लागेल.
ते कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी पुरेसे नाही, असे मत पानपट्टीचालकांचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सूचनेचा विचार करू नये, अशी मागणी पानपट्टीचालकांची आहे.दरम्यान, गुटखा बंदी करतेवेळी राज्यातील सर्व पानपट्टीधारकांनी याचे स्वागत केले. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने पानपट्टीचालकांना गुटख्याच्या बदल्यात इतर वस्तू विक्रीला परवानगी देतो, असे सांगितले होते. कालांतराने सुगंधी तंबाखूवर सरकारने बंदी घातली. त्यातच आता खाद्य वस्तू पानपट्टीत विकण्यावर बंदी केली. त्यामुळे पानपट्टी व्यवसाय धोक्यात आला असल्याचे मत पानपट्टीचालकांनी व्यक्त केले. मोर्चासाठी जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाो शिंदे, विनायक घळसासी, उमेश ठोंबरे, वायचळ, आदी पानपट्टीचालक गेले होते.पानपट्टीचालक दृष्टिक्षेपात...(कोल्हापूर जिल्हा) ५५०० -कोल्हापूर जिल्हा ७५०-कोल्हापूर शहरमागण्या...१तंबाखू व तंबाखुजन्य वस्तू उत्पादन, वितरण साठा या संदर्भात केंद्र सरकारने बनविलेल्या ‘कोटपा’ कायद्याचा फेरविचार करावा२तंबाखू व तंबाखूजन्य वस्तू विक्रीच्या दुकानांत पेपरमिंटस्, चॉकलेटस्, बिस्किटस्, चिप्स, कोल्ड्रिंग्ज आदी वस्तुंची विक्री करू नये, या केंद्र सरकारने केलेल्या सूचनेचा राज्य सरकारच्यावतीने विचार केला जाऊ नये. ३तंबाखू वस्तू विक्रीसाठी परवाना असावा, परंतु स्वतंत्र परवाना असावा, अशी घातली जाणारी अट रद्द करण्यात यावी.
पानपट्टीचालकांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांची लवकरच भेट घेऊन हा प्रश्न मांडणार आहे. १ जानेवारी २०१८ पासून पानपट्टीत खाद्य वस्तूची विक्री करू नये, असे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे सर्व पानपट्टीचालक अखेरपर्यंत याप्रश्नी लढा देतील.-अरुण सावंत, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पानपट्टी असोसिएशन.