सांगली : दमदार पंच मारत मुंबई उपनगरच्या बॉक्सर्सनी सांगलीतील राज्य बॉक्सिंग स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. २९ गुणांची कमाई करीत मुंबई उपनगरने विजेतेपद पटकावले. विजेत्या मुंबईकरांना ‘आमदार सुधीर गाडगीळ चषक’ प्रदान करण्यात आला. पुणेकरांना मात्र दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. 30 वी महाराष्ट्र राज्य ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धा येथील आपटा पोलीस चौकी बॉक्सिंग रिंगमध्ये पार पडली. राज्यातील २३ जिल्ह्यांतील दोनशे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार सुधीर गाडगीळ व जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक पुरोहित होते. यावेळी मुन्ना कुरणे यांनी स्वागत केले. शेरखान कुरणे यांनी आभार मानले. यावेळी महाराष्ट्र अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशनचे सरचिटणीस भारतकुमार व्हावळ, राजन जोताडीया, अनिल चोरमले, समशेर कुरणे, आदी उपस्थित होते. अंतिम निकाल असा: ४६ किलो : विक्रम माईबम (पुणे), ४८ किलो : आदिल सिंग (मुंबई), ५० किलो : रोहित चव्हाण (पुणे), ५२ किलो : निखिल दुबे (मुंबई उपनगर), ५४ किलो : बिरू बिंद (मुंबई उपनगर), ५७ किलो : आकाश मानेरे (पुणे), ६० किलो : सूरज बचके (औरंगाबाद), ६३ किलो : विघ्नेश खोपडे (मुंबई उपनगर), सचिन चव्हाण (क्रीडापीठ), ७० किलो : एस. गोपी (पुणे), ७५ किलो : वृषभ मरकुटे (पुणे), ८० किलो : आदर्श कांबळे (सातारा), ८० किलोवरील : रोहन ताक (औरंगाबाद).या स्पर्धेतून निवडलेला संघ भीमावरम् (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय युथ बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबई उपनगरला विजेतेपद
By admin | Published: February 11, 2016 10:09 PM