कोल्हापूर : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्ये रेल्वेने २० फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर विशेष शुल्कावर एक एकेरी विशेष गाडी अतिजलद धावणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कोल्हापूर या एकेरी मार्गावर ही विशेष गाडी क्रमांक ०१०९९ दि. २० फेब्रुवारीपासून अतिजलद धावणार आहे. ही गाडी या दिवशी सकाळी १२:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११:३० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कऱ्हाड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले आणि कोल्हापूर या मार्गावर थांबे असतील. आईसीएफ कोचचे १७ डब्बे, एक वातानुकूलित द्वितीय, चार वातानुकूलित तृतीय, ८ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ४ जनरल सेकंड क्लासचे डबे या गाडीला आहेत.या गाडीला विशेष शुल्कया एकमार्गी विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहे. आज, दि. १६ फेब्रुवारीपासून या गाडीतून प्रवास करण्यासाठी आरक्षण सुरू होणार आहे. सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर याचे आरक्षण करता येणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मंगळवारपासून मुंबई ते कोल्हापूर विशेष रेल्वे सुरु
By संदीप आडनाईक | Published: February 16, 2024 1:18 PM