ज्योतीप्रसाद सावंत - आजरा-तालुक्याच्या राजकारणापेक्षा स्थानिक राजकारणाला दिले जाणारे महत्त्व, देसाई आणि पाटील मंडळींचे असणारे वर्चस्व यामुळे सरोळी गावातील ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक पातळीवर प्रतिष्ठेची मानली जाते. सात सदस्यीय ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची सत्तासूत्रे पुणे-मुंबईसह कोल्हापूर येथे कामानिमित्त असणारी गावकरी मंडळीच ठरविणार आहेत.गत पंचवार्षिक निवडणुकीत आकाराम देसाई, मनोहर पाटील, रंगराव पाटील या मंडळींनी मधुकर (एम. के. )देसाई यांच्यावर एकतर्फी विजय मिळविला होता. या निवडणुकीत मात्र एम. के. देसाई, विठ्ठल पाटील, नीळकंठ कांबळे यां मंडळींनी सावध भूमिका घेत व्यूहरचना केली आहे.आकाराम देसाई, मनोहर पाटील, रंगराव ईश्वर पाटील यांच्या भावेश्वरी पॅनेलमधून महेशकुमार ईश्वर सुतार व मनोहर तुकाराम पाटील या विद्यमान सदस्यांना तसेच वेगळ्या इतर पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये रेखा आकाराम देसाई, संजीवनी आनंदा पाटील, विजय विठ्ठल कांबळे, कमल जनार्दन सुतार, शामल बस्तू बार्देस्कर यांचा समावेश आहे.मधुकर देसाई, विठ्ठल पाटील, नीळकंठ कांबळे यांच्या भावेश्वरी ग्राम विकास पॅनेलमधून धनाजी बंडू सुतार, सुनंदा शिवाजी पाटील, संगीता धोंडिबा पाटील, संजय कांबळे, शोभाताई सुतार, वर्षा देसाई, रंगराव पाटील यांचा समावेश आहे. मुळात काट्याची टक्कर, त्यात २६८ मतदार हे बाहेरगावी असणारे चाकरमनी त्यामुळे सरोळी ग्रामपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार आहे.
सरोळीत मुंबईकर मतदार ठरविणार सत्तेची सूत्रे
By admin | Published: April 16, 2015 10:24 PM