शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

आक्षेपार्ह चित्रांबाबत मुंबईची प्रदर्शन संयोजिका पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 4:07 PM

आक्षेपार्ह चित्रांबाबत ‘द अनडिफिटेड सेकंड किंग आॅफ स्वराज्य.. संभाजी महाराज’ या चित्रप्रदर्शनाच्या मुंबई येथील संयोजिका स्मृती शिरसाट यांना कोल्हापुरातील शिवभक्तांनी सोमवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही चित्रे रेखाटणाऱ्या चित्रकार दिपक विनोद प्रकाश गुप्ता यांना ताब्यात घेईपर्यंत पोलिसांनी संयोजिकेला सोडू नये. या कलाकाराने चित्रांतून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत चुकीची मांडणी, बदनामी केली आहे. संबंधित कलाकाराने जाहीर माफी मागावी. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असे संयोगिताराजे आणि इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देआक्षेपार्ह चित्रांबाबत मुंबईची प्रदर्शन संयोजिका पोलिसांच्या ताब्यातगुन्हा दाखल करण्याची शिवभक्तांची मागणी; कलाकाराकडून चुकीची मांडणी : संयोगिताराजे

कोल्हापूर : आक्षेपार्ह चित्रांबाबत ‘द अनडिफिटेड सेकंड किंग आॅफ स्वराज्य.. संभाजी महाराज’ या चित्रप्रदर्शनाच्या मुंबई येथील संयोजिका स्मृती शिरसाट यांना कोल्हापुरातील शिवभक्तांनी सोमवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही चित्रे रेखाटणाऱ्या चित्रकार दिपक विनोद प्रकाश गुप्ता यांना ताब्यात घेईपर्यंत पोलिसांनी संयोजिकेला सोडू नये. या कलाकाराने चित्रांतून छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत चुकीची मांडणी, बदनामी केली आहे. संबंधित कलाकाराने जाहीर माफी मागावी. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, असे संयोगिताराजे आणि इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.येथील शाहू स्मारकभवनमध्ये मुंबईच्या आर्ट रिव्होल्युशनने चित्रप्रदर्शन भरविले होते. त्यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलची आक्षेपार्ह चित्रे लावली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवभक्त, संभाजीराजेप्रेमींनी हे प्रदर्शन बंद पाडले.आक्षेपार्ह चित्रे ताब्यात घेतली. प्रदर्शनाच्या संयोजिका शिरसाट यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संयोगिताराजे यांनी भवानी मंडप येथील जुना राजवाडा येथे बोलविले.

यावेळी संयोगिताराजे, मंजुश्री पवार, प्राचार्य अजेय दळवी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर शिरसाट यांना योग्य स्पष्टीकरण देता आले नाही. त्यांनी या प्रकाराबाबत माफी मागितली. संतप्त शिवभक्तांनी शिरसाट यांना जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. चित्रकार, संयोजिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवभक्तांनी केली.यावेळी शहाजी माळी, संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील, विकी जाधव, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता पाटील, आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत संयोगिताराजे म्हणाल्या, या प्रदर्शनातील कलाकारांबाबतची माहिती देणारे पत्रक आणि उदघाटनाची निमंत्रण पत्रिका पाहता त्यामध्ये आक्षेपार्ह चित्रे असतील असे वाटले नव्हते. मात्र, काही शिवभक्तांनी प्रदर्शन पाहताच त्यांना धक्का बसला. त्यांनी या आक्षेपार्ह चित्रांची माहिती दिली. त्यावर आम्ही तातडीने संबंधित चित्रे ताब्यात घेतली. अशा पद्धतीने कोणत्याही महापुरूषांची बदनामी करणे चुकीचे आहे. कलाकारांकडून असे पुन्हा होवू नये.

मंजुश्री पवार म्हणाल्या, या चित्रांतून छत्रपती संभाजीराजे यांचे शौर्य, पराक्रम, त्यांचे योगदान दाखविण्यात आलेले नाही. त्यांची बदनामी आणि प्रतिमाभंजन केले आहे. संबंधित कलाकाराने केवळ स्वत:ची प्रसिद्धी व्हावी याउद्देशाने अशी आक्षेपार्ह चित्रे काढली आहेत. चित्र रेखाटण्यासाठी ऐतिहासिक संदर्भ वापरलेले नाहीत. संयोजिकेने देखील चूक झाल्याचे कबूल केले आहे.

अजेय दळवी म्हणाले, राज्यघटनेने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, संंबंधित कलाकाराने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला आहे. समाजमान्य महापुरूषाची आक्षेपार्ह चित्रे काढण्याची मोठी चूक केली आहे. कलाकारांनी जबाबदारीने कार्यरत रहावे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करावाया प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रण पत्रिकेवर संयोगीताराजे यांचे नाव परवानगी न घेता छापले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी मला या प्रदर्शनाची माहिती घेवून येण्यास सांगितले. त्यानुसार मी प्रदर्शन पाहण्यासाठी गेलो. छत्रपती संभाजी महाराज यांचा स्त्री रूपात पुर्नजन्म झाला, तर ते कसे दिसतील, याबद्दलची आक्षेपार्ह चित्र या प्रदर्शनात दिसून आली, असे शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी संगितले.

आक्षेपार्ह चित्रांचे हे प्रकरण गंभीर आहे. महापुरूषाची बदनामी करणाऱ्या संबंधित चित्रकार, संयोजिका यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. याबाबत आम्ही सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेतली आहे. प्रदर्शनातील आक्षेपार्ह चित्रे शासनाने ताब्यात घ्यावीत, अशी आमची मागणी असल्याचे सावंत यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीartकलाkolhapurकोल्हापूर