शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मुंबईच्या प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: February 23, 2016 12:52 AM

तरुणीचा मृत्यू : तरुणाची प्रकृती चिंताजनक; हातकणंगले येथे विषप्राशन

हातकणंगले : हातकणंगले रेल्वे फाटकाजवळ असणाऱ्या राम मंदिरसमोरील पान टपरीमागे मुंबई येथील सोनी मनीष नीळकंठ (वय ३४) आणि अरुण प्रल्हाद नाईक (३६) या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पे्रयसी सोनी नीळकंठ हिचा मृत्यू झाला, तर अरुण याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, अरुण प्रल्हाद नाईक आणि सोनी मनीष नीळकंठ हे विरार येथून ९ जानेवारीला बेपत्ता झाले होते. सोमवारी पहाटे हातकणंगले येथील इचलकरंजी रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ राम मंदिरसमोरील पान टपरीमागे अरुण आणि सोनी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे मॉर्निंगवॉकला आलेल्यांना दिसले. त्यांनी ही माहिती हातकणंगले पोलिसांना दिली. त्यांनी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सकृतदर्शनी दिसत होते. दोघेही बेशुद्ध असल्यामुळे पोलिसांना त्यांचा पत्ता शोधणे अवघड होते. दोघांशेजारी एक मोबाईल, पाण्याची बाटली व नॅपकीन पडला होता. मोबाईलमधील सीमकार्ड फेकून दिले होते. मात्र, हँडसेटमधील नंबरवरून या दोघांचा पत्ता शोधून पोलिसांनी त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. तरूणी विवाहित असून, तिला १३ वर्षांचा मुलगा आहे. तिचा पती वसई येथे इस्टेट एजंट असल्याचेही सांगण्यात आले. रात्री उशिरा नातेवाईक हातकणगंले येथे दाखल झाले आहेत. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्यप स्पष्ट झालेले नाही असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)