शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मनपाच्या पाणी टँकरला गळती

By admin | Published: January 07, 2015 11:35 PM

नासाडी : टँकरची दुरवस्था, डागडुजी आणि नूतनीकरणाची गरज

कोल्हापूर : शहरवासीयांसाठी उपसा करण्यात येणाऱ्या एकूण पाण्यापैकी ३० टक्के पाणी गळक्या पाईपमुळे गटारीत वाहून जाते तर घरगुती, व्यावसायिक तसेच क्रीडा कारणासाठी पाणीवहनाचे काम करणाऱ्या महापालिकेच्या टॅँकरला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. ‘पाणी वाचवा’चा संदेश देणाऱ्या प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे.महापालिकेकडून दररोज १२० ते १३० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याचा पंचगंगेतून उपसा केला जातो. मात्र, यातील २५ ते ३० टक्के पाणी पाईपलाईनच्या गळतीमुळे वाया जात असल्याचे चित्र आहे. वाया जाणाऱ्या पाण्याचा विचार केल्यास या पाण्याची किंमत महिन्याला एक कोटींपेक्षा जास्त भरते. परिणामी, वर्षाला साधारण १० ते १५ कोटी रुपयांची नासाडी गळक्या पाईपलाईनमुळे होत आहे. पाण्याची गळती, दुरुस्ती व त्यामुळे होणारे रस्त्यांचे नुकसान, असे मिळून किमान महिन्याला कोट्यवधी रुपये पाण्यात जात आहेत.गळक्या पाईपलाईनवर सध्या तरी महापालिकेकडे दुरूस्त्या करण्याशिवाय उपाय नाही. एक गळती काढली की दुसऱ्या गळत्या स्वागताला तयार असतात. या गळत्यांमधून पाण्याची नासाडी कमी होते म्हणून की काय महापालिकेला गळणाऱ्या टँकरकडे पाहण्यास वेळ नाही. महापालिकेकडे असणारे सर्वच टॅँकर वयोमानानुसार जुने झाले आहेत. सततच्या वापरामुळे टॅँकरची टाकी गंजली आहे. तसेच त्यांचे आयुष्यमानदेखील संपत आले आहे. गळणाऱ्या टँकरमधून दररोज हजारो लिटर शुद्ध केलेले पाणी वाया जाते. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने टँकरच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)वाहनधारकांची कसरतमहापालिकेचे पाण्याचे टँकर मागणीनुसार शहरभर पाणी पुरविण्याचे काम करत असतात. कसबा बावडा जलशुद्धिकरण केंद्रातून टँकरमध्ये पाणी भरले जाते. गळके टँकर रस्त्यावर पाण्याचा लोंढा सोडत जातात. त्यामुळे रस्त्यांवरही पाणीच पाणी होते.धूळ व टँकरच्या पाण्यामुळे रस्ते निसरडे झाल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.अपव्ययाचा आकडादररोज उपसा १२० ते १३० दशलक्ष लिटर (एमएलडी) सर्वप्रकारच्या गळतीमुळे दररोज २५ ते ३५ एमएलडी पाण्याची नासाडीवर्षाला गळतीमुळे १० ते १५ कोटी रुपयांची नासाडी दुरुस्तीच्या कामावर कोट्यवधी रुपयांचा खर्च