शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
12
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
13
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
14
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
15
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
16
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
17
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

मुंडे अपघात विम्याचा खातेदारासह कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 4:01 PM

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, खातेदार शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.

ठळक मुद्देमुंडे अपघात विम्याचा खातेदारासह कुटुंबातील एका व्यक्तीस लाभज्ञानदेव वाकुरे यांची माहिती : विमा हप्ता शासन भरणार

कोल्हापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, खातेदार शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी दिली.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही १० डिसेंबर २०१९ ते ९ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी आहे. या योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये, तर एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळते. या योजनेचा विमा हप्ता शासनाने भरला आहे.

सरपंच, गावकामगार तलाठी, पोलीस पाटील यांनी आपल्या गावातील एखाद्या शेतकऱ्याचा अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास त्यांना या योजनेची माहिती द्यावी. त्याचबरोबर या योजनेच्या अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी साहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.दृष्टिक्षेपात योजना-

  • योजनेचे नाव : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना.
  • विमा हप्ता : शासन भरणार
  • लाभ कोणाला : खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एक सदस्य (१० ते ७५ वयोगटातील)
  • किती मिळणार भरपाई : व्यक्तीचा अपघाती मृत्यू अथवा दोन अवयव निकामी झाल्यास दोन लाख. एक अवयव निकामी झाल्यास एक लाख.
टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरGovernmentसरकार