फोटो क्रमांक - १९२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळ्याबाबतच्या तक्रारी ऐकण्यासाठी विविध व्यक्ती, संस्थांचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त विनायक औंधकर उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)
फोटो क्रमांक - १९२०२१-कोल-केएमसी०२
ओळ - कोल्हापुरातील गोखले कॉलेज परिसरात आढळलेल्या एका अनोळखी वयोवृद्धास उपचारासाठी कुठेच दाखल करून न घेतल्याने काही कार्यकर्त्यांनी त्यांना महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेले. त्यानंतर त्यांना आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. (छाया : नसीर अत्तार)
फोटो क्रमांक - १९२०२१-कोल-कोल्हापूर गर्दी
ओळ - कोल्हापूर शहरातील सरसकट सर्वच दुकाने सुरू झाल्याने सर्वत्र गर्दीच दिसत होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झाली होती. (छाया : आदित्य वेल्हाळ).