कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापालिका कर्मचाऱ्याच्या वतीने ५० हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस प्रदान करण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी या शेणींचा स्वीकार केला.
महापालिका कर्मचाऱ्याकडून गेली आठ वर्षे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रथम १० हजार शेणी, दुसऱ्या वर्षी २० हजार शेणी, तिसऱ्या वर्षी ३० हजार, फायर एक्स्टिंग्युशर व भिंतीवरील मोठे घड्याळ व चौथ्या वर्षी ३० हजार शेणी, पाचव्या, सहाव्या, सातव्या वर्षीही ४० हजार व या वर्षीही ५० हजार शेणी प्रदान करण्यात आल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, साहाय्यक आयुक्त चेतन कोंडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १५१२२०२०-कोल-शेणी दान
ओळ - कोल्हापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांतर्फे मंगळवारी पंचगंगा स्मशानभूमीस ५० हजार शेणी दान करण्यात आल्या. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी त्यांचा स्वीकार केला.