कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील २३२ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून २६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क लावावा, शारीरिक अंतर ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करावा असे नियम करण्यात आले आहेत. वारंवार नियमांचे पालन करा असे आवाहन करण्यात येते तरीही काही नागरिक नियमांचे पालन करत नाहीत.
शुक्रवारी महापालिका, केएमटी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी नियम तोडणाऱ्या २३२ लोकांकडून २६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. विनामास्क २३० व्यक्तींकडून २३ हजार १०० रुपये, शारीरिक अंतर न ठेवणाऱ्या तीन लोकांकडून तीन हजार रुपये, असा २६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे हा आहे, असे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी म्हटले आहे.