कोल्हापूर : येथील महापालिकेच्या आरोग्य घनकचरा विभागातर्फे शनिवारी शहरातील शिवाजी चौकात प्लास्टिकबंदीसंबंधी जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकच्या परिणामाचे फलक हातात घेऊन प्रबोधन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी चौकात प्लास्टिक बंदीसंबंधी आपलं कोल्हापूर, स्वच्छ कोल्हापूर, प्लास्टिकमुक्त कोल्हापूर यासारख्या घोषणा देण्यात आल्या. घोषणांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी पापाची तिकटी, बाजार गेट परिसर, भाऊसिंगजी रोड परिसरात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या फळ विक्रेते, भाजी विक्रेते, दुकानदार यांच्याकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्यांना यापुढे प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबद्दल सक्त सूचना देण्यात आल्या.
यावेळी माहिती शिक्षण व संवाद अधिकारी नीलेश पोतदार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, दिलीप पाटणकर, मनोज लोट, शुभांगी पवार, महेश भोसले, स्वच्छता दूत, अमित देशपांडे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
फोटो : २८०८२०२१-कोल- महापालिका जनजागृती
कोल्हापुरातील महापालिकेच्या आरोग्य घनकचरा विभागातर्फे शनिवारी शहरातील शिवाजी चौकात प्लास्टिकबंदीसंबंधी जनजागृती करण्यात आली.