शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

‘बीओटी’वर चालणार महापालिकेची गाडी

By admin | Published: April 01, 2016 1:03 AM

अर्थसंकल्प : चार मार्केट, बहुमजली पार्किंग, मेडिकल हेल्थ सिटी, वाय-फाय यंत्रणेचा समावेश--महानगरपालिका अर्थसंकल्प

कोल्हापूर : महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा न करता ‘बीओटी’वर शहर विकासाचा कार्यक्रम राबविण्याचा संकल्प कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. बहुमजली पार्किंग, वाय-फाय सेवा, मेडिकल हेल्थ सिटी याच्यासह शिंगोशी, कपिलतीर्थ, ताराराणी व शाहू क्लॉथ, आदी मार्केट बीओटीवर विकसित करण्यात येणार आहेत, तर शहरातील विविध प्रकल्पांतून प्राप्त होणाऱ्या प्रीमियममधून मुख्य प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा सन २०१६-२०१७ सालाचा नवीन वर्षाचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव यांनी गुरुवारी महासभेसमोर मंजुरीसाठी मांडला. प्रशासनाने १८ मार्चला ११३२ कोटी जमेचा आणि पाच कोटी २६ लाख इतके शिल्लकी अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले होते. त्याला अंतिम रूप देऊन आवश्यक त्या फेरबदलांसह सभापती जाधव यांनी हा अर्थसंकल्प महासभेत मांडला. विशेष म्हणजे तो अर्थसंकल्प सादरीकरणासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंगचा आधार घेण्यात आला. त्यासाठी सभागृहात तीन एलईडी बसविण्यात आले होते. प्रशासनाने दिलेल्या अंदाजपत्रकातील आकडेवारीत जमेच्या बाजूला महसुली व भांडवली २२ कोटी ०८ लाख रुपयांची वाढ सुचविण्यात आली आहे. या वाढीव रकमेतून सात कोटी ९२ लाख रुपये महसुली व भांडवली खर्चाकडे वळविण्यात आले आहेत, तर दीड कोटी रुपये के.एम.टी.ला अर्थसहाय देण्याची सूचना अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. डांबरी रस्ते पॅचवर्कसाठी ८० लाखांची नव्याने तरतूद करण्यात आलेली आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेले ‘बीओटी प्रकल्प वगळता’ स्थायी समितीने प्रशासनाच्या अंदाजपत्रकात फारसा बदल केलेला नाही. ‘बीओटी’वर उभारण्यातयेणारे प्रकल्प ०१ मध्यवर्ती बसस्थानक येथे बहुमजली कार पार्किंग प्रकल्प ०२ शहरात आॅप्टिकल फायबर केबलद्वारे वाय-फाय सेवा उपलब्ध करणार. ०३ आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी आयसोलेशन हॉस्पिटलच्या आरक्षित जागेत मेडिकल हेल्थ सिटी उभारणार. ०४ महानगरपालिकेच्या मालकीची शिंगोशी, कपिलतीर्थ, ताराराणी व शाहू क्लॉथ ही चार मध्यवर्ती मार्केट विकसित करणार. नगरसेवकांना असा मिळणार निधी प्रभागात मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक नगरसेवकांना सहा लाख, तर स्वीकृत नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा निधी देणार. स्थायी समितीवर सदस्य असणाऱ्या सोळा नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देणारविशेष अधिकारात महापौरांना १५ लाख, उपमहापौरांना १० लाख, स्थायी सभापतींना १५ लाख, सभागृहनेता १० लाख, तर विरोधी पक्षनेता १० लाखांचा जादा निधी देणार. या व्यतिरिक्त विविध विकासकामे करण्यासाठी दोन कोटी ६५ लाख, तर प्रभागातील लोकोपयोगी कामे करण्यासाठी तीन कोटी ७६ लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे.