कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत शहरात मंगळवारी ११ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात ४५ वर्षांवरील ४,४८५ नागरिकांना कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात आला. शहरात आजअखेर एक लाख ३१ हजार ४०८ नागरिकांना पहिल्या डोसचे तर, ६५ हजार १७७ दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनी दुसऱ्या डोसकरिता ज्यांचे ८४ दिवसापेक्षा जास्त दिवस झालेल्या नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण बुधवारी करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडून फोनद्वारे बोलविण्यात येईल अशा नागरिकांनीच लसीकरणाकरिता गरी आरोग्य केंद्रात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवारी ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसचे नियोजन करण्यात आले आहे. याकरीता ऑनलाईन बुकिंग स्लॉट आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजता खुले होणार आहेत. तरी पात्र लाभार्थ्यांनी बुधवारी आपला स्लॉट बुकिंग करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.