शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

महापालिकेचे आर्थिक नियोजन बिघडणार

By admin | Published: February 18, 2015 1:32 AM

महापौर राजीनामा नाट्य : नगरसेवकांच्या महासभेवरील बहिष्काराने प्रशासनापुढे पेच

संतोष पाटील / कोल्हापूर महापौर तृप्ती माळवी यांनी राजीनामा न दिल्यास काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक महासभेवर बहिष्कार टाकणार आहेत. येत्या २८ फेब्रुवारीला वार्षिक आर्थिक नियोजनाच्या मंजुरीसाठी सभा घ्यावी लागणार आहे. सभेपुढील निर्णयावर मंजुरीची मोहर उमटविण्यासाठी सभागृहात किमान २८ नगरसेवकांची उपस्थितीत अनिवार्य आहे. सभेच्या मंजुरीसाठी प्रशासनाने प्रस्ताव ठेवल्यानंतर ९० दिवसांत सभा न झाल्यास आयुक्तांच्या अधिकारात प्रस्तावास मंजुरी दिली जाऊ शकते. या प्रशासकीय पेचामुळे येत्या वर्षातील आर्थिक लेखाजोखाच्या नियोजनासह प्रशासकीय मंजुऱ्या रखडणार असल्याने प्रशासनापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महापौर तृप्ती माळवी यांनी दोनवेळा राजीनाम्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत ‘ठेंगा’ दाखविला. महापौर राजीनामा देण्यास तयार नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. महापौर राजीनामा न देण्यावर ठाम राहिल्यास सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, अशी घोषणा दोन्ही काँग्रेसने केली आहे. कोरमअभावी सभा न झाल्यास वार्षिक आर्थिक आराखडा नियोजनाचे काय होणार, हा प्रश्न प्रशासनास सतावत आहे. सभेअभावी प्रशासकीय खर्चासह विकासकामांना ‘खो’ बसण्याची शक्यता आहे.