मुंबई : मुंबईकरांचे तारणहार ठरलेल्या अग्निशमन दलातील अपुरे मनुष्यबळ आणि मर्यादित उपकरणांवर कायम बोट उचलले गेले आहे़ परंतु अशा अत्यावश्यक सेवेला या परिस्थितीतही अद्ययावत करण्यासाठी सुनील नेसरीकर यांनी प्रमुख पदाच्या अल्पावधी कारकिर्दीतही मोठे योगदान दिले होते़ असा मार्गदर्शकच हरपल्याने अग्निशमन दलाचे मनोधैर्यच खचले आहे़अंधेरी येथील लोट्स बिझनेस पार्क या भीषण आगीप्रकरणी तत्कालीन प्रमुख ए़ वर्मा यांची पदावनती करण्यात आली़ त्यांच्या जागेवर जुलै २०१४ मध्ये नेसरीकर यांना प्रमुखपदी बढती मिळाली़ मात्र आजतागायत ते या पदावर प्रभारी म्हणून काम करीत होते़ चांगली निर्णय क्षमता, कल्पक बुद्धी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान असल्याने नेसरीकर यांनी अल्पावधीतच अग्निशमन दलामध्ये अनेक प्रयोग केले़ अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या जवानांच्या दररोजच्या कवायती सुरू करण्यात आल्या़ इमारतींच्या फायर आॅडिटसाठी स्वतंत्र अग्नी प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्याची संकल्पना त्यांचीच होती़ दुर्दैवाने त्यांची ही संकल्पना अद्याप अमलात आलेली नाही़ त्यांनी अग्निशमन दलामध्ये आणलेल्या शिस्तीमुळे कर्मचारी संघटनांकडून येणाऱ्या तक्रारीही कमी झाल्या होत्या़ अग्निशमन दल अद्ययावत करण्याची जबाबदारीच त्यांनी उचलली होती़ दुर्दैवाने त्यांचे हे लक्ष्य अपुरेच राहिले, अशी खंत अग्निशमन दलातील जवान व्यक्त करीत आहेत़ (प्रतिनिधी)नेसरीकर यांचे योगदानच्आगीच्या घटनास्थळी लवकर मदत पोहोचावी यासाठी नियंत्रण कक्षाची कार्यक्षमता आणि प्रतिसादातील विलंब टाळण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते़ प्रमुख विभागांमध्ये केंद्रस्थानी मिनी फायर स्टेशन ही त्यांचीच संकल्पना होती़च्उत्तुंग इमारतींमध्ये आगींचे प्रमाण वाढल्यामुळे ९० मीटरची शिडी अग्निशमन दल खरेदी करीत आहे़ ३० मजल्यांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या या शिडीची तपासणी करण्यासाठी ते स्वत: फिनलँडला गेले होते़‘या प्रसंगातूनही आम्ही सावरू’१४ ते १९ एप्रिल या अग्निशमन सप्ताहात १९४४ मध्ये शहीद झालेल्या ६६ शहिदांचे स्मरण केले जाते़ हा दिवस पे्ररणा दिन म्हणून पाळण्यात येतो़ नेसरीकर यांनी या दलाचे प्रमुख म्हणून या सप्ताहमध्ये कोणते उपक्रम असावे, याची माहिती वरिष्ठांपासून कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांकडून मागवली होती़ सर्वांना एकत्रित घेऊन वाटचाल करणाऱ्या अशा अधिकाऱ्याच्या जाण्याने जवानांचे मनोधैर्य खचले आहे. तथापि, या प्रसंगातून सावरून आम्ही पुन्हा उभे राहू, असे प्रभारी प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांदळे यांनी म्हटले आहे.
महापालिका विद्युत अभियंत्यास मारहाण
By admin | Published: May 26, 2015 12:45 AM