शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास मारहाण

By admin | Published: March 27, 2015 12:27 AM

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गुन्हा

कोल्हापूर : मोजमाप पुस्तिका देण्यास नकार दिल्याने गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने महापालिकेच्या गांधी मैदान कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यास बेदम मारहाण केली. निवास साधू पोवार (वय ४०, रा. इंगवले कॉलनी, फुलेवाडी) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पोवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी संशयित आरोपी रविराज भीमराव मोहिते (रा. नागाळा पार्क) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी सांगितले, महापालिकेच्या गांधी मैदान येथील विभागीय बांधकाम कार्यालयात कनिष्ठ अभियंता निवास पोवार हे सकाळी कामावर होते. यावेळी महापालिकेचे परवानाधारक बांधकाम व्यावसायिक भीमराव मोहिते यांचा मुलगा रविराज कार्यालयात आला. त्याने पोवार यांच्याकडे मोजमाप पुस्तिकेची मागणी केली. त्यावर त्यांनी कायद्याने ती देता येत नाही. तुम्ही अकराच्या सुमारास महापालिकेत या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारून दाखविली जाईल, असे सांगितले. पुस्तिका देत नसल्याचा रागातून रविराज याने पोवार यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीच्या या प्रकाराने कार्यालयात गोंधळ उडाला. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी पोवार यांची सुटका केली. त्यानंतर रविराज हा शिवीगाळ करीत निघून गेला. पोवार यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यास सांगितले. पोवार यांना मारहाण झाल्याची माहिती समजताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह इतर कर्मचारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आले. याठिकाणी त्यांनी रविराज मोहितेविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मारहाणीत डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने पोवार यांच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपी मोहिते याला अटक केली नव्हती. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)