इचलकरंजी : सततची पाणीटंचाई व पाईपलाईन गळती या विषयावर चर्चा करण्यासाठी नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागाची बैठक झाली. यामध्ये जुने पंप दुरुस्त करणे, पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू ठेवणे. तसेच कट्टीमोला डोहची पाईपलाईन एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहराला कृष्णा व पंचगंगा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. कृष्णा योजनेची वारंवारची गळती व पंचगंगा नदीतील अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहराला पाण्याची टंचाई भासत आहे. कृष्णा योजनेसाठी ५४० अश्वशक्तीचे दोन पंप, तर पंचगंगा योजनेसाठी २५० अश्वशक्तीची एक व १०० अश्वशक्तीची एक अशा दोन पंप कार्यान्वित आहेत. हे पंप सन २००४ मध्ये बसविण्यात आले आहेत. त्या अजूनही बदललेल्या नाहीत. त्यामुळे वारंवार बंद पडत आहेत. या सर्वांची दुरुस्ती करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, पाणीपुरवठा अभियंता अंकिता मोहिते, सुभाष देशपांडे, बाजी कांबळे उपस्थित होते.
पाणीटंचाईबाबत पालिकेत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:24 AM