शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

महापालिका आरक्षण-शहरातील ६० प्रभागांवर थेट आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 5:33 PM

Muncipal Corporation reservation - कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी प्रभाग आरक्षण जाहीर झाले. सोडतीद्वारे आरक्षण जाहीर करण्यात येईल असे आधी जाहीर करण्यात आले होते; मात्र तब्बल ६० प्रभागांवर सोडत न काढताच थेट आरक्षण टाकण्यात आले. केवळ २१ प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले.

ठळक मुद्देमहापालिका आरक्षण - शहरातील ६० प्रभागांवर थेट आरक्षणसोडत काढली २१ प्रभागांचीच

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी प्रभाग आरक्षण जाहीर झाले. सोडतीद्वारे आरक्षण जाहीर करण्यात येईल असे आधी जाहीर करण्यात आले होते; मात्र तब्बल ६० प्रभागांवर सोडत न काढताच थेट आरक्षण टाकण्यात आले. केवळ २१ प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले.

आरक्षण जाहीर होत असताना उपस्थितांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला; पण तुमच्या सूचना व हरकती द्या त्यावर सुनावणी घेऊ, इतके माफक उत्तर देऊन अधिकाऱ्यांनी अधिक खोलात जाण्याचे टाळले.आरक्षण सोडत जाहीर करण्याची ही प्रक्रिया येथील केशवराव भोसले नाट्यगृहात सुमारे पावणे तीन तास चालली. सभागृहात आसनक्षमतेच्या पन्नास टक्के प्रेक्षकांना बसण्यास परवानगी दिली होती.

राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सनस, अव्वल सचिव अतुल जाधव व कक्ष अधिकारी प्रदीप परब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली, तर प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, चेतन कोंडे, संदीप घार्गे, निवडणूक अधीक्षक विजय वणकुद्रे यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी शहरातील १ ते ८१ प्रभागांचे सादरीकरण केले. सर्वप्रथम अनुसूचित जाती प्रवर्गासाठी अकरा प्रभागांवर आरक्षण निश्चित करण्यात आले. हे आरक्षण निश्चित करताना त्या त्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येची टक्केवारी विचारात घेण्यात आली.

त्याआधारे अकरा प्रभागांची नावे जाहीर करण्यात आली. त्यातून मग सहा प्रभाग याच प्रवर्गातील महिलांसाठी निश्चित करण्यात आले. त्यामध्ये पूर्वी महिलांसाठी आरक्षण नसलेल्या तीन प्रभागांवर थेट आरक्षण टाकण्यात आले, तर तीन प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे करण्यात आले.१५ प्रभागांवर ओबीसीचे थेट आरक्षणनागरिकांचा मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गासाठी २२ प्रभाग निश्चित करण्यात आले. मागच्या तीन निवडणुकीत ज्या प्रभागांवर ओबीसी आरक्षण नव्हते अशा १५ प्रभागांवर थेट आरक्षण जाहीर करण्यात आले, तर सात प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. या २२ प्रभागातील अकरा प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक १३ व प्रभाग क्रमांक २४ वर थेट आरक्षण टाकण्यात आले, तर नऊ प्रभाग सोडतीद्वारी निश्चित करण्यात आले.फक्त दोनच प्रभागांत सर्वसाधारण महिलांसाठी सोडत -सर्वसाधारण प्रवर्गासाठी सगळ्यात जास्त उत्कंठा लागून राहिलेली होती. अनुसूचित जातीचे अकरा व ओबीसीचे २२ प्रवर्ग निश्चित झाल्यानंतर ४८ प्रभाग आपोआपच सर्वसाधारण झाले. परंतु, त्यातून २४ प्रभागांवर महिलांचे आरक्षण निश्चित केले गेले.

२००५, २०१० व २०१५ च्या निवडणुकीत महिला आरक्षण नसलेले २४ प्रभाग त्यासाठी पात्र ठरविण्यात आले. २२ प्रभागावर यापूर्वी महिला आरक्षण नव्हते त्या प्रभागावर थेट सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित केले, तर केवळ दोन प्रभागांचे आरक्षण सोडतीद्वारे जाहीर केले.

अनुसूचित जातीचे आरक्षण पूर्ण होईपर्यंत कसलीच उत्सुकता नव्हती; परंतु ओबीसी व सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित केले जात होते, तेव्हा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत गेली. परंतु, ही उत्कंठा पुढे काही वेळातच संपुष्टात आली.

सभागृहात उपस्थित असलेल्या अनेकांच्या चेहऱ्यांवर उत्साह फुललेला दिसून आला; पण ज्यांचे प्रभाग गेले त्यांच्या चेहऱ्यावर मात्र तीव्र नाराजी दिसून आली. शेवटी आभार प्रदर्शन विनायक औंधकर यांनी मानले.

 

प्रभागनिहाय आरक्षण यादी -

१. शुगर मिल - सर्वसाधारण महिला२. कसबा बावडा पूर्व बाजू - सर्वसाधारण महिला३. कसबा बावडा हनुमान तलाव - सर्वसाधारण महिला४. कसबा बावडा लाईन बाजार - सर्वसाधारण५. लक्ष्मी विलास पॅलेस - सर्वसाधारण महिला६. पोलीस लाईन - सर्वसाधारण७. सर्कीट हाऊस - अनुसूचित जाती - पुरुष८. भोसलेवाडी कदमवाडी - अनुसूचित जाती - पुरुष९. कदमवाडी - सर्वसाधारण१०. शाहू कॉलेज - सर्वसाधारण महिला११. ताराबाई पार्क - सर्वसाधारण महिला१२. नागाळा पार्क - सर्वसाधारण महिला१३. रमण मळा - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला१४. व्हीनस कॉर्नर - सर्वसाधारण महिला१५. कनान नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला१६. शिवाजी पार्क - अनुसूचित जाती महिला१७. सदर बाजार - सर्वसाधारण१८. महाडिक वसाहत - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष१९. मुक्त सैनिक वसाहत - अनुसुचित जाती महिला२०. राजर्षी छत्रपती मार्केट यार्ड - अनुसूचित जाती पुरुष२१. टेंबलाईवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला२२. विक्रमनगर - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष२३. रुईकर कॉलनी - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष२४. साईक्स एक्सटेंशन - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला२५. शाहपुरी तालीम - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष२६. कॉमर्स कॉलेज - नागरिकांचा मागासवर्ग पुरुष२७. ट्रेझर ऑफीस - सर्वसाधारण२८. सिद्धार्थ नगर - सर्वसाधारण महिला२९. शिपुगडे तालीम - सर्वसाधारण३०. खोलखंडोबा - अनुसूचित जाती महिला३१. बाजारगेट - सर्वसाधारण३२. बिंदू चौक - सर्वसाधारण महिला३३. महालक्ष्मी मंदिर - सर्वसाधारण३४. शिवाजी उद्यमनगर - सर्वसाधारण महिला३५. यादवनगर - सर्वसाधारण३६. राजारामपुरी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला३७. राजारामपुरी - तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल - सर्वसाधारण३८. टाकाळा खण माळी कॉलनी - नागरिकांचा मागास वर्ग पुरुष३९. राजारामपुरी एक्स्टेन्शन - सर्वसाधारण महिला४०. दौलतनगर - अनुसूचित जाती महिला४१. प्रतिभानगर - सर्वसाधारण महिला४२. पांजरपोळ -सर्वसाधारण४३. शास्त्रीनगर- जवाहरनगर - सर्वसाधारण महिला४४. मंगेशकरनगर - सर्वसाधारण महिला४५. कैलासगडची स्वारी मंदिर - सर्वसाधारण महिला४६. सिद्धाळ गार्डन - सर्वसाधारण४७. फिरंगाई - सर्वसाधारण४८. तटाकडील तालीम - सर्वसाधारण४९. रंकाळा स्टँड - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला५०. पंचगंगा तालीम - नागरिकांचा मागास प्रवर्ग५१. लक्षतीर्थ वसाहत - सर्वसाधारण५२. बलराम कॉलनी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला५३. दुधाळी पॅव्हेलियन - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला५४. चंद्रेश्वर - सर्वसाधारण५५. पद्माराजे उद्यान - सर्वसाधारण महिला५६. संभाजीनगर बसस्थानक - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला५७. नाथा गोळे तालीम - सर्वसाधारण महिला५८. संभाजीनगर - सर्वसाधारण महिला५९. नेहरुनगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग - पुरुष६०. जवाहरनगर - सर्वसाधारण महिला६१. सुभाषनगर - सर्वसाधारण६२. बुद्धगार्डन - अनुसूचित जाती पुरुष६३. सम्राटनगर - सर्वसाधारण६४. शिवाजी विद्यापीठ - कृषी महाविद्यालय - नागरिकांचा माागास प्रवर्ग महिला६५. राजेंद्रनगर - सर्वसाधारण महिला६६. स्वातंत्र्य सैनिक कॉलनी - सर्वसाधारण६७. रामानंदनगर- जरगनगर - अनुसुचित जाती महिला६८. कळंबा फिल्टर हाऊस - सर्वसाधारण६९. तपोवन - सर्वसाधारण महिला७०. राजलक्ष्मीनगर - सर्वसाधारण७१. रंकाळा तलाव - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला७२. फुलेवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष७३. फुलेवाडी रिंगरोड - नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष७४. सानेगुरुजी वसाहत - सर्वसाधारण७५. आपटेनगर तुळजाभवानी - अनुसूचित जाती महिला७६. साळोखेनगर - सर्वसाधारण७७. शासकीय मध्यवर्ती कारागृह - सर्वसाधारण७८. रायगड कॉलनी - बाबा जरगनगर - सर्वसाधारण७९. सुर्वेनगर - अनुसुचित जाती पुरुष८०. कणेरकरनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग८१. क्रांतिसिंह नाना पाटील, नगर जिवबा नाना पार्क - सर्वसाधारण महिला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाreservationआरक्षणkolhapurकोल्हापूर