कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी सोमवारी आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक मान्यवरांना आपल्या हक्काच्या मतदारसंघावर आरक्षणामुळे पाणी सोडावे लागले. त्यांना निवडणूक लढवायचीच झाली तर शेजारचे प्रभाग शोधावे लागतील किंवा पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवावे लागेल. मागच्या सभागृहातील सहा माजी महापौरांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे; परंतु त्या उभे राहणार की त्यांच्या घरातील सदस्य उभे राहणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
मागच्या सभागृहातील गटनेते शारंगधर देशमुख, संजय मोहिते, सचिन पाटील, संदीप कवाळे, विलास वास्कर, नियाज खान, मुरलीधर जाधव, विजय सूर्यवंशी, संभाजी जाधव, राहुल माने, भूपाल शेटे, राजसिंह शेळके, अजित राऊत, अजित ठाणेकर, सुभाष बुचडे यांसारख्या नावाजलेल्या माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षण अडकल्यामुळे त्यांना तेथून उभे राहता येणार नाही. त्यामुळे त्यांना अन्य प्रभागाचा शोध घ्यावा लागेल. काही नगरसेवकांना आपल्या पत्नीला, तर काही नगरसेविकांना आपल्या पतीस संधी द्यावी लागणार आहे.
सहा माजी महापौरांना पुन्हा संधी -
मागच्या सभागृहातील अश्विनी रामाणे, हसीना फरास, स्वाती यवलुजे, शोभा बोंद्रे, सूरमंजिरी लाटकर, सरिता मोरे या माजी महापौरांना पुन्हा निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे त्यांचे प्रभाग सर्वसाधारण झाले आहेत. त्या निवडणूक लढण्याऐवजी त्यांच्या घरातील कोणाचे सासरे, कोणाचे पती, कोणाचा मुलगा निवडणुकीस उभारण्याची जास्त शक्यता आहे. केवळ निलोफर आजरेकर यांचा प्रभाग ओबीसी पुरुष असा आरक्षित झाला असल्याने त्यांच्याऐवजी त्यांचे पती अस्किन आजरेकर निवडणूक लढविणार असल्याचे सांगण्यात आले.
कवाळे कुटुंबाला पुन्हा मिळणार संधी-
महापालिका राजकारणात नशीबवान असलेल्या माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांच्या घराण्याला पुन्हा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. शिवाजी कवाळे नंतर त्यांच्या पत्नी कांचन कवाळे, सून कादंबरी कवाळे, मुलगा संदीप कवाळे यांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली. आता त्यांच्या हक्काच्या मतदारसंघावर ओबीसी महिला आरक्षण पडले आहे. त्यामुळे शिवाजी कवाळे यांची सून दिव्यानी कवाळे या ओबीसी असल्याने त्यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे कांचन, कादंबरी या महापौर झाल्या, तर संदीप स्थायी सभापती झाले आहेत.
- हे माजी नगरसेवक नव्या सभागृहात दिसणार नाहीत -
संदीप नेजदार, सुभाष बुचडे, अशोक जाधव, अर्चना पागर, रत्नेश शिरोळकर, अर्जुन माने, राहुल चव्हाण, दिलीप पोवार, आशिष ढवळे, सीमा कदम, राजसिंह शेळके, सुरेखा शहा, कमलाकर भोपळे, शोभा कवाळे, संजय मोहिते, पूजा नाईकनवरे, किरण शिरोळे, ईश्वर परमार, हसिना फरास, सचिन पाटील, मुरलीधर जाधव, नियाज खान, माधवी गवंडी, राहुल माने, प्रतापसिंह जाधव, शेखर कुसाळे, संभाजी जाधव, विजय सूर्यवंशी, अजित राऊत, वहिदा सौदागर, प्रवीण केसरकर, लाला भोसले, सुनील पाटील, विजयसिंह खाडे-पाटील, शारंगधर देशमुख, इंदुमती माने, रिना कांबळे, राजू दिंडोर्ले, मेघा आशिष पाटील, वनिता देठे, अभिजित चव्हाण.
या नगरसेवकांना पुन्हा संधी -
माधुरी लाड, स्वाती येवलुजे, शोभा बोंद्रे, जयश्री चव्हाण, सूरमंजिरी लाटकर, स्मिता माने, भाग्यश्री शेटके, जयश्री जाधव, रूपाराणी निकम, दीपा मगदूम, वृषाली कदम, मनीषा कुंभार, प्रतीक्षा पाटील, अश्विनी रामाणे, गीता गुरव जरी या नगरसेविकांना संधी मिळणार असली तरी लाटकर, फरास, इंगवले, कदम लढणार -
महापालिकेच्या राजकारणात आपली छाप पाडणारे सत्यजित कदम, राजेश लाटकर, आदिल फरास, सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले यांना त्यांचे हक्काचे प्रभाग मिळाले आहेत. भूपाल शेटे, शारंगधर देशमुख, अजित ठाणेकर, महेश सावंत, पूजा नाईकनवरे यांना शेजारच्या भागातून निवडणूक लढवावी लागेल.