चार हजार सिरिंज दान
कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले, पंचगंगा व सदर बाजार प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रासाठी महापालिकेच्या जुना जकात ग्रुपचे कर्मचारी यांनी चार हजार सिरिंज दान दिले. साहित्य महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्याकडे देण्यात आले.
महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन जुना जकात ग्रुपचे कर्मचारी यांनी हे साहित्य दिले. यावेळी माजी नगरसेवक शेखर कुसाळे, रवी पोवार, संजय अतिग्रे, प्रदीप व्हरांबळे, विश्वनाथ निकम, राकेश भोसले, तुषार सोनार, बाजीराव कांबळे, विशाल सुगते, पोपट जांभळे, सुरेश सांळोखे, आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने बुद्ध जयंती साजरी
कोल्हापूर : बुद्ध जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे बुधवारी महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात बुद्धांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते फुले वाहण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर अभियंता नारायण भोसले व कर्मचारी उपस्थित होते.