Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी मुरलीधर जाधवच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 04:39 PM2023-01-25T16:39:09+5:302023-01-25T16:39:41+5:30
तानाजी घोरपडे हुपरी : गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ...
तानाजी घोरपडे
हुपरी : गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने केलेली नियुक्ती वैध असल्याचा निर्णय आज उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जाधव यांना मोठा दिलासा मिळाला.
शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात सत्तांत्तर झाले. अन् शिंदे - फडणवीस सरकार सत्तेत येताच राजकीय द्वेषातून जाधव यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. राज्य सरकारच्या या निर्णयाला जाधव यांनी आव्हान दिले होते. या संदर्भात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती के. एच. श्रीराम व राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर वेळोवेळी सुनावणी होवून त्याचा आज फैसला झाला.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून ९ जुलै २०२१ ला नियुक्ती केली होती. संचालक मंडळाच्या काही बैठकांना ते उपस्थितही राहिले होते. दरम्यान, शिवसेनेतील फुटीमुळे राज्यात सत्तांत्तर झाले अन् शिंदे -फडणवीस सरकार आले. यानंतर सप्टेंबर २०२२च्या आदेशान्वये जाधव यांची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला. याविरोधात जाधव यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या संदर्भात वेळोवेळी सुनावणी होवून जिल्हा प्रमुख जाधव यांची तत्कालीन ठाकरे सरकारने केलेली नियुक्ती वैध असल्याचा निकाल दिला.