मलकापूर/कोल्हापूर : शाहूवाडी तालुक्यातील सावर्डे खुर्द येथे जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या शैलजा अरविंद पाटील (वय ३2) हीचा घरगुती वादातुन पती अरविंद सर्जेराव पाटील यांने नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून खुन केल्याची घटना घडली आहे. याची नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे. घटना शुक्रवारी पहाटे ५.४५ वाजता घडली. या घटनेने सावर्डे खुर्द गावात खळबळ उडाली आहे . पोलीसातुन मिळालेली माहेती अशी पन्हाळा तालुक्यातील मसुदमाले गावातील अरविंद पाटील यांचेशी शैलजा पाटील यांचा विवाह बारा वर्षापूर्वी झाला होता. त्यांना अकरा व सात वर्षाची दोन मुले आहेत. एक वर्षापूर्वी शाहूवाडी तालुक्यातील माण प्राथमिक आरोग्य केंद्रार्गत असणाऱ्या सावर्डे खुर्द उपकेंदात आरोग्य सेविका म्हणून काम करीत होत्या.
उपकेंद्रात असणाऱ्या क्वॉर्टर्स मध्ये पती, पत्नी राहत होते. लॉक डाऊनमुळे त्यांची दोन मुले मसुदमाले येथे सासु सासऱ्याकडे होती. अरविंद पाटील हे भाजीचा व्यवसाय करीत होते. शैलजा पाटील सध्या पेरीड येथील कोविड सेंटरमध्ये सेवा बजावेत होत्या. गुरूवारी दि. 2८ रोजी नोकरी करून घरी गेल्या. रात्री दोघेही जेवण करून झोपले पहाटे अरविंद याने झोपलेल्या अवस्थेत शैलजा यांचा नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून खुन केला व पोलीस पाटील भिमराव पाटील यांना बोलावून सदर घटनेची माहिती दिली.पोलीस पाटील यांने शाहूवाडी पोलीसांना सदर घटनेची माहिती देवून पोलीसात फीर्याद दाखल केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. निरंकारी यांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली.