शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

गोठ्याच्या जागेसाठी वरणगेत सख्ख्या भावाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2021 4:17 AM

कोल्हापूर/ प्रयाग चिखली : सामाईक जागेत जनावरांचा गोठा बांधत असल्याच्या कारणांवरून सख्ख्या भावांसह पुतण्याने धारदार गुप्तीने सपासप वार करून ...

कोल्हापूर/ प्रयाग चिखली : सामाईक जागेत जनावरांचा गोठा बांधत असल्याच्या कारणांवरून सख्ख्या भावांसह पुतण्याने धारदार गुप्तीने सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना करवीर तालुक्यात वरणगे येथे शनिवारी सकाळी घडली. भगवान रामचंद्र बुचडे (वय ५५ रा. मातंग वसाहत, वरणगे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेमुळे गावात खळबळ उडाली, एकमेकांवरील हल्ल्यात दोन पुतणेही जखमी झाले. हल्ल्यात गुप्ती, तलवार, कुऱ्हाड, काठ्या, दगड यांचाही वापर केला.

पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरील माहिती अशी की, वरणगे गावात भैरवनाथ बुचडे व भगवान बुचडे हे दोघे सख्खे भाऊ राहतात. दोघांच्या नावे वडिलोपार्जित १५ गुंठे शेतजमीन व जुन्या घरांची ५ गुंठे सामाईक जमीन आहे. घरामागील जागेवरून दोघांतील वाद मिटवण्यासाठी ‘तंटामुक्ती’ने पुढाकार घेतला. बैठकीपूर्वीच भैरवनाथ हा गोठा उभारत होता. शनिवारी सुतारांकडून तुळ्या बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी भगवान व चार बहिणींनी भैरवनाथची भेट घेऊन ‘तंटामुक्ती’च्या निर्णयानंतर बांध, असे समजावले. त्यावरून भावात वाद उफाळून झटापट झाली. भैरवनाथचा मुलगा विकास ऊर्फ नाना बुचडे यानेही चुलते भगवानवर हल्ला केला. भगवानचा मुलगा महेश व संदीप हेही दुचाकीवरून तेथे आले, त्यानीही भैरवनाथसह नानावर हल्ला केला. हल्ल्यात गुप्ती, तलवार, कुऱ्हाड, काठ्या, दगड अशा हत्यारांचा वापर केला. चार बहिणींनीसह जावयानेही वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. भगवानवर गुप्तीने सपासप वार झाले. घरासमोरच ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले व गतप्राण झाले. हल्ल्यात महेश व संशयित विकास ऊर्फ नाना हे दोघेही जखमी झाले.

परिसरात मोठा गोंधळ, आरडा-ओरडा झाल्याने गावकरी धावले. घटनेनंतर भैरवनाथ व नाना या पिता-पुत्राने सरकारी रुग्णालय गाठले. प्रभारी करवीर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळेकर तसेच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

‘तंटामुक्ती’ बैठकीपूर्वीच निकाल

वडिलोपार्जित सामाईक जमिनीवरून मृत भगवान व भैरवनाथ बुचडे या सख्ख्या भावांच्या कुटुंबांत वाद होता. वाद मिटवण्यासाठी तंटामुक्ती समितीने पुढाकार घेऊन यापूर्वी दोन वेळा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. दोघा भावांसह पाच बहिणींची एकत्र मंगळवारी बैठकीचे नियोजन केले होते. त्यासाठी बहिणी आल्या होत्या. तोपर्यंत वादावादी झालीच.

वार ‘आरपार’

हल्ल्यातील मृत भगवान यांच्या पाठीत धारदार गुप्ती भोसकल्याने ती पोटातून बाहेर आली. त्यांच्या कमेरेत, छातीवर, डाव्या हातावर खोलवर जखम झाल्या. त्यांचा मुलगा महेशच्या हातावर तर संशयित नाना बुचडे याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली.

दोन्ही घरांतून आक्रोश..

दोन्ही कुटुंबांची परिस्थिती गरिबीची. मयत भगवान यांनी काही वर्षे पोस्टात नोकरी केली. सध्या ते मोलमजुरी करत होते. संशयित भैरवनाथ हा पोस्टात नोकरीस असून सेवानिवृत्तीसाठी अकरा महिने बाकी आहेत. दोघांंचीही दोन मुले खासगी नोकरी करतात. घटनेनंतर दोन्ही घरांत सुरू असणारा आक्रोश हृदय पिळवटणारा होता.

फोटो, ओळी स्वतंत्र फाईल देतो..