शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

Kolhapur: पोर्ले तर्फ ठाणे येथे तरुणाचा निर्घृण खून, सैन्य दलातील जवानासह तिघांनी केले वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 11:43 IST

आईने हात जोडले, तरीही दया नाही

कोल्हापूर/पोर्ल तर्फ ठाणे : पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे निटवडे रोडवर पूर्ववैमनस्यातून सैन्य दलातील जवानाने दांडक्याने आणि अवजड हत्याराने मारहाण करून विकास आनंदा पाटील (वय ४०, रा. पोर्ले तर्फ ठाणे) याचा खून केला. रविवारी (दि. १९) सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील वस्तीवरून जनावरांच्या धारा काढून घरी जाताना विकास याच्या आईसमोरच खुनी हल्ल्याची घटना घडली. हल्लेखोर युवराज शिवाजी गायकवाड (वय ४०, रा. पोर्ले तर्फ ठाणे) याच्यासह अनोळखी दोघे घटनास्थळावरून पसार झाले.घटनास्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, सैन्य दलात पंजाबमध्ये कार्यरत असणारा युवराज गायकवाड आणि पोर्ले तर्फ ठाणे येथे शेती करणारा विकास पाटील या दोघांमध्ये वाद होता. फेब्रुवारी महिन्यात दोघांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर ड्यूटीवर गेलेला युवराज शनिवारी रात्रीच सुटीवर गावी आला होता. रविवारी सायंकाळी शेतातील कामे आणि जनावरांच्या धारा काढून विकास आईला दुचाकीवर घेऊन घरी निघाला होता. निटवडे रोडवर कमानीजवळ वाटेत थांबलेला युवराज आणि अनोखळी दोघांनी विकासची दुचाकी अडवली. खाली पाडून त्याच्यावर काठी आणि अवजड हत्याराने हल्ला चढवला. अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईला ढकलून हल्लेखोरांनी विकासला बेदम मारहाण केली. परिसरातील ग्रामस्थांची गर्दी वाढताच हल्लेखोरांनी कारमधून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेतील विकास याला त्याचे मित्र विश्वास पाटील आणि विकास भोपळे या दोघांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. काही वेळातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. विकास याचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईक आणि मित्रांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली. दरम्यान, पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये पोहोचून माहिती घेतली. रात्री उशिरा याबाबत पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.कट रचून हल्लातीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर युवराज याने कट रचून विकासचा काटा काढल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. हल्ल्यानंतर युवराज गायकवाड याच्यासह दोन साथीदारांनी पलायन केले. अन्य दोघांनी तोंडाला मास्क लावले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पथक रवाना झाल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली.नाजूक संबंधातून वाद?युवराज आणि विकास यांच्यात नाजूक संबंधातून वाद होता. यातून त्या दोघांमध्ये अनेकदा संघर्ष झाला होता, अशी चर्चा गावात सुरू होती. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण संशयितांच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल. फिर्यादीचा जबाब आणि संशयितांच्या चौकशीतून खुनाचे कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.आईने हात जोडले, तरीही दया नाहीअंगाने मजबूत असलेल्या विकासवर तिघांनी एकदम हल्ला केला. रस्त्यावर कोसळलेल्या विकासला वाचवण्यासाठी त्याची आई हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न करीत होती. तिने हात जोडून गयावया केली, तरीही हल्लेखोरांना दया आली नाही. काही लोकांनी मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर त्यांच्याही अंगावर धावून गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

वाटेत पाणी प्यायलाअत्यवस्थ अवस्थेतील विकास याला मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. वाटेत त्याने दुचाकी थांबवून पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर तो पुन्हा दुचाकीवर बसला. मात्र, सीपीआरमध्ये पोहोचेपर्यंत त्याची शुद्ध हरपली होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस