पोर्ले तर्फ ठाणे : येथील तरुण शेतकरी विकास आनंदा पाटील (वय ४०) यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिस तपासातून समोर आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांनी दिली. संशयित आरोपी युवराज शिवाजी गायकवाडसह त्याचे चार साथीदार अद्यापही फरारी आहेत. त्यांना शोधण्यासाठी तीन पोलिस पथके रवाना झाली आहेत. याबाबत पन्हाळा पोलिसात रविवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला असून, गुन्ह्याची फिर्याद विकासची आई मालूबाई पाटील यांनी दिली आहे.विकासच्या पत्नीबरोबर आरोपी युवराज गायकवाड याचे अनैतिक संबंध होते. यातून विकास आणि पत्नीच्या नातेवाइकांनी युवराजला समज देऊनही ऐकत नसलेने त्याला नोव्हेंबरमध्ये मारहाण केली होती. तोच डाव मनात ठेवून युवराजने रविवारी विकास पाटील डेअरीत दूध घालून शेतातील गोठ्याकडे जात होता, त्यावेळी त्याला वाटेत आडवून साथीदारांच्या मदतीने त्यांच्या शरीरावर बांबूच्या काट्या आणि हातोडीने वरमी घाव घातले. त्यात विकासचा मृत्यू झाला.हे कळताच युवराज साथीदारांसह घरीतून फसार झाला असून, पन्हाळा पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या दोन पथकांद्वारे त्यांचा शोध सुरू आहे. तपासकामी युवराजच्या नातेवाइकांसह मित्रांना पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. विकासला मारहाण करण्यासाठी वापरलेल्या बांबूच्या काट्या, रबरी पट्टा, लोखंडी हातोडा आणि चारचाकी गाडी संशयित आरोपीच्या घराशेजारील जागेतून जप्त केली आहे.
आश्वासनानंतर मृतदेह ताब्यातसंशयित आरोपी युवराज गायकवाड आणि त्याच्या चार साथीदारांना जोपर्यंत अटक करणार नाही तोपर्यंत विकासचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. नातेवाईकांच्या या भूमिकेने सीपीआरच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, आरोपीला लवकरात लवकर पकडून अटक करू, असे आश्वासन पोलिस अधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी नातेवाइकांना दिल्यानंतर विकासचा मृतदेह सोमवारी ताब्यात घेतला.घरातून फरफटत बाहेर आणले..विकासला दुचाकीवरून खाली खेचल्यावर आरोपीने विकासला हातोडी आणि बांबूच्या काठ्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. मारामुळे घायाळ झालेला विकास जीव वाचविण्यासाठी रांगतरांगत तेथील एका घरात शिरला आणि आतून कडी घातली. आरोपीने घरातील त्या लोकांना दमदाटी करून कडी काढायला भाग पाडले. त्यानंतर विकासला फरफटत बाहेर आणून मारले.