शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

पुंगळ्या, गोळी सीबीआयच्या ताब्यात

By admin | Published: February 19, 2016 1:14 AM

पानसरे हत्या प्रकरण : नवी दिल्लीतील प्रयोगशाळेत होणार तपासणी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेल्या पाच पुंगळ्या व डॉक्टरांनी पानसरे यांच्या अवयवांमधून काढण्यात आलेली एक गोळी गुरुवारी नवी मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पथकाला देण्यात आली. बंद लखोट्यामधून पुंगळ्या व गोळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी सीबीआयचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश देवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दुपारी दिल्या. त्यानंतर सीबीआयच्या या अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी चर्चा करून हे पथक येथून बाहेर पडले. दरम्यान, पानसरे हत्येतील मिळालेल्या या पुंगळ्या व गोळी सीबीआयचे हे पथक लवकरच नवी दिल्लीतील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज (सीएफएसएल) येथे तपासासाठी देणार आहे.गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पानसरे हल्ल्यातील जप्त पुंगळ्या व गोळी द्याव्यात, अशी सूचना सकाळी केली. त्याप्रमाणे अमृत देशमुख हे दुपारी बंद लखोट्यामधून पुंगळ्या व गोळी घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याशी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी वर्मा यांच्या दालनात चर्चा करून ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातून दुपारी तेथून बाहेर पडले. सीबीआयचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश देवरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके हे दोन अधिकारी ते दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस कार्यालयात आले. त्यावेळी देवरे यांनी पानसरे हल्ल्यातील पुंगळ्या व गोळी मिळाव्यात, असे सीबीआयचे मागणीपत्र पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना दिले. त्यानंतर देशमुख यांनी दोन पंचांसमक्ष सीबीआयला बंद लखोट्यामधून पाच पुंगळ्या व एक गोळी दिली.कोल्हापुरात सागरमाळ येथे दि. १६ फेबु्रवारी २०१५ ला गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडण्यात आल्या. दि. २० फेबु्रवारीला गोविंद पानसरे यांचा मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटीचे (विशेष तपास पथक) प्रमुख संजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. दाभोलकर व पानसरे यांच्या तपास यंत्रणेला या दोन्ही हत्यांमध्ये साधर्म्य असून एकाच प्रकारच्या रिव्हॉल्वरमधून हा दोन्ही हत्येचा झाल्याचा तर्क तपास यंत्रणेने यापूर्वी काढला आहे.दरम्यान,‘अंनिस’चे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयने पानसरे हत्येमधील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या पुंगळ्या व गोळी तपासासाठी मिळाव्यात, अशी विनंती अर्जाद्वारे कोल्हापुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने तपास अधिकारी व सरकारी वकिलाचे मत घेऊन सीबीआयच्या अर्जाला मंजुरी दिली. न्यायालयाने पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना राजारामपुरी पोलिसांनी जप्त केलेल्या पुंगळ्या व एक गोळी द्याव्यात, असे आदेशाचे पत्र पाठविले होते.