आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : उधारी न दिल्यामुळे तरुणाला शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी देत धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि. १६) रात्री शिवाजी विद्यापीठ रस्त्यावर घडली. या हल्लयात आकाश गणेश केंबळे (वय २१, रा. राजारापमुरी चौथी गल्ली, कोल्हापूर) हा तरुण जखमी झाला. त्याच्यावर छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर)मध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी संशयित अजय माने उर्फ लातूर (वय २१, रा . दौलतनगर) याला राजारामपुरी पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद आकाशची आई अर्चना गणेश केंबळे यांनी दिली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, अर्चना केंबळे यांना आकाशसह दोन मुले आहेत.त्या कदमवाडीतील एका क ॅटरर्समध्ये कामाला जातात. पुण्याहून त्यांचा मुलगा आकाश आठवड्यापुर्वी घरी आला होता. बुधवारी रात्री तो शिवाजी विद्यापीठ रस्त्यावरील खरे मंगल कार्यालयासमोर शुभम हळदकर व विकी कलकुटगी मित्रांसमवेत बसला होता. त्यावेळी संशयित अजय माने उर्फ लातूर हा त्याठिकाणी आला. त्याने ‘माझे उधारीचे पैसे दे असे म्हणत आकाशबरोबर वाद घालत त्याच्यावर धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला केला. यात आकाश जखमी झाला. त्याला शुभम व विकी दोघां मित्रांनी दूचाकीवरुन जखमी अवस्थेत सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले. आकाशच्या मित्रांनी हा प्रकार त्यांची आई अर्चना केंबळे यांना कळविला. त्यानूसार त्याही सीपीआरमध्ये आल्या. अर्चना केंबळे यांनी, संशयित अजय माने हा उधारीचे पैसे आकाशकडे मागत असल्याचे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संशयित अजय मानेवर भारतीय दंडविधान संहिता कलम ३०७ (खूनाचा प्रयत्न), ५०४ (शिवीगाळ), ५०६ (धमकी)असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्मिता काळभोर या करीत आहेत.
उधारीच्या कारणातून तरुणावर खुनी हल्ला
By admin | Published: March 16, 2017 6:09 PM