महापुराने सर्वत्र वाहतूक बंद असल्याने ही घटना वेळाने प्रशासनासमोर आली. डोंगरावरील वैरण काढायला आलेल्या काही शेतकऱ्यांनी ही दुर्घटना बघितली. एकाच वेळी एवढा मोठा भाग डोंगरातून घसरल्याने या शेतकऱ्यांची भीतीने गाळण उडाली. मुरगूडहून जा-ये करण्यासाठी बोळावी, बोळावीवाडी, ठाणेवाडी, पळशिवणे, अवचितवाडीचे ग्रामस्थ मोटरसायकल, बस, दुचाकी व चारचाकी अन्य वाहने या मार्गाचा वापर करतात. या मार्गावरून प्रवास करतात. सद्या या मार्गावर झालेल्या दलदलीतून प्रवास करताना अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. दोन वर्षांपूर्वी याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जमीन खचली होती.
सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत तातडीने दखल घेत रस्त्यावर आलेला दरडीचा काही भाग बाजूला करून दुचाकी वाहनांना ये-जा करण्याची सोय केली. तथापि अजूनही रस्त्यालगतच्या उंचवट्याचा भाग कोसळण्याची भीती असल्यामुळे तातडीने या ठिकाणी संरक्षक भिंत उभारल्यास वरून येणारा रस्ता व दरड वाचू शकेल. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने याची दखल घेऊन ही संरक्षक भिंत उभा करणे आवश्यक आहे. दरम्यान, उपकार्यकारी अभियंता शिंदे, अभियंता पाटील, मुरगूडचे सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. वरिष्ठांच्या आदेशाने दरड उपसण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याची माहिती कंत्राटदार विजय पाटील यांनी दिली.
फोटो ओळ
मुरगूड बोळावी या रस्त्यावर डोंगराचा भला मोठा कडा तुटून खाली आल्याने हा रस्ता बंद आहे.