शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

Kolhapur: मुरगुडमधील ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव भरला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 4:23 PM

अनिल पाटील मुरगुड : मुरगुड परिसरात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसाने मुरगुड, यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे ...

अनिल पाटीलमुरगुड : मुरगुड परिसरात गेल्या आठ दिवसापासून सुरू असणाऱ्या संततधार पावसाने मुरगुड, यमगे, शिंदेवाडी या गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारा ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. पावसाने उसंत घेतली असली तरी तलावा मधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गतवर्षी पेक्षा पंधरा दिवस उशिरा तलाव भरला असून आता मुरगुड शहरासह यमगे शिंदेवाडी आदी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे.शहराच्या पूर्वेकडील बाजूस यमगे, शिंदेवाडी, गावच्या हदीमध्ये साधारणता १९२० च्या सुमारास हा तलाव बांधला गेला. तलावाच्या स्थापनेपासून आजपर्यंत मुरगुड शहरासह यमगे शिंदेवाडी या तिन्ही गावांना अव्यहातपणे पिण्यासाठी पाणी पुरवले जाते. त्यामुळे नगरपालिका प्रशासना बरोबर शहरातील नागरिक सुद्धा तलाव भरण्याची आतुरतेने वाट पहात होते. या तलावातून २२५ एकर शेतीसह मुरगूड, शिंदेवाडी, यमगे या गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. मागील आठ दिवसांपासून परिसरात संततधार सुरू असल्याने तलावात पुर्ण क्षमतेने भरला. सांडव्या वरून वाहणाऱ्या पाण्यात भिजण्यासाठी नागरिकांनी याठिकाणी गर्दी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस