शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मुरलीधर जाधव यांच्यासह पंटरांना तडीपार करणार

By admin | Published: March 27, 2016 1:15 AM

दिनेश बारी : मोबाईल कॉल डिटेल्सची तपासणी सुरू

कोल्हापूर : क्रिकेट बेटिंगचा मुुख्य सूत्रधार महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह पंटरांवर तडीपारची कारवाई करण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे गोळा करून अहवाल सादर करण्याचे आदेश राजारामपुरी पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. लवकरच त्यांच्यावर तडीपारची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सम्राटनगर येथील सावित्री अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकून टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या दोघा पंटरांना अटक केली होती. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह पाच ते सहाजणांचे आम्ही पंटर असून त्यांच्या सांगण्यावरून बेटिंग घेत असल्याची कबुली त्यांनी दिल्याने पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांनी शनिवारी दुपारी राजारामपुरी पोलिस ठाण्यास भेट दिली. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याशी दीड तास चर्चा करून बेटिंगचा मुुख्य सूत्रधार महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह पंटरांना तडीपार करण्यासाठी त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करून तत्काळ अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या. गतवर्षी सभापती मुरलीधर जाधव यांच्या टाकाळा येथील जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. ४०२ मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या चालू क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असताना राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी जाधव यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता; परंतु पोलिस निरीक्षक देशमुख यांनी बेटिंगचा म्होरक्या जाधव यांचा जामीन रद्द करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. कठोर कारवाई होऊनही सभापती जाधव यांच्यात सुधारणा झालेली नाही. त्यांचे अवैध धंदे सुरूच आहेत, त्यामुळे त्यांना तडीपार करण्याची तयारी पोलिसांनी केल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.