शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

खरपीतील रस्त्यांवर पसरला मुरूम

By admin | Published: July 08, 2017 1:19 AM

गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खरपी येथील रस्त्यावर ग्रामपंचायतीने मुरूमाऐवजी माती टाकली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून परतताना भरधाव मोटार रस्त्याकडेच्या झाडावर आदळल्याने तीन तरुण अभियंते ठार, तर दोघे जखमी झाले. सांगलीतील पुष्पराज चौकात जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर गुरुवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता हा अपघात झाला. मोटारीचा पुढील टायर फुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज विश्रामबाग पोलिसांनी व्यक्त केला आहे. विकी अंकुश चव्हाण (वय २४, रा. यशवंतनगर, सांगली), सम्मेद भारत निल्ले (२६, जैन गल्ली, सोन्याची शिरोली, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) व निनाद राजेंद्र आरवाडे (२२, एस.टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. मोटारीचा चालक नितांत राजेंद्र बुटाले (२६, पत्रकारनगर, सांगली) व सुनील महावीर मडके (२२, कवठेपिरान, ता. मिरज) हे जखमी झाले आहेत. बुटाले याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मडके किरकोळ जखमी झाला होता, त्याला उपचारानंतर घरी सोडले आहे. विकी, निनाद, सम्मेद आणि वृषभ (पूर्ण नाव समजू शकले नाही) चांगले मित्र असून, वृषभचा गुरुवारी वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवस साजरा करण्यासाठी चौघेही सांगली-मिरज रस्त्यावरील वानलेसवाडी येथील हॉटेल ‘खवय्या’मध्ये गेले. त्यांचा आणखी एक मित्र असलेला नितांत बुटाले बांधकाम व्यावसायिक आहे, तर सुनील मडके त्याच्याकडे सुपरवायझर आहे. सध्या नितांत याचे दुधगाव (ता. मिरज) येथे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी खडी लागणार असल्याने तो सुनीलसह गुरुवारी रात्री खडी आणण्यासाठी टोप-संभापूर (जि. कोल्हापूर) येथे गेला होता. तेथे त्याला दूरध्वनी आला आणि वृषभचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यालाही बोलावण्यात आले. त्यानुसार तो आणि सुनील वानलेसवाडी येथे आले. तेथील हॉटेलमध्ये केक कापून जेवण केल्यानंतर रात्री दीड वाजता सर्वजण हॉटेलमधून बाहेर पडले. वृषभ त्याच्या घरी गेला. उर्वरित पाचजण मोटारीतून (क्र. एमएच ०२ एवाय ४९१) सांगलीकडे निघाले. नितांत मोटार चालवित होता, त्याच्या बाजूला सुनील बसला होता, तर तिघेही मृत पाठीमागील सीटवर बसले होते. मोटार भरधाव वेगाने सांगलीकडे येत होती. प्रथम मार्केट यार्डजवळील गतिरोधकावर मोटार जोरात आदळली. तेथे बुटालेचा मोटारीवरील ताबा सुटला होता. तरीही तो त्याच वेगाने पुढे आला. जिल्हा बँकेसमोर आल्यावर त्याचा पुन्हा ताबा सुटल्याने मोटार रस्त्याकडेच्या झाडावर जाऊन आदळली. मोटार एवढ्या जोरात आदळली की, पाठीमागे बसलेल्या तिघांना बाहेरही पडता आले नाही. ते तिघे एकमेकांवर जोरात आदळले. मोटारीची मागची बाजू पूर्णपणे चेपली गेली. एका वाहनधारकाने हा अपघात पाहिला. त्याने पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विकी चव्हाण, सम्मेद निल्ले यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. निनाद आरवाडेला मिरजेला नेण्यात येत होते; परंतु त्याचाही वाटेतच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच मृतांच्या नातेवाइकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. पाठलागाच्या भीतीची चर्चाविश्रामबाग चौकात मोटार आल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोटार तशीच भरधाव वेगाने पुढे गेली. पोलीस पाठलाग करतील या भीतीने नितांतने वेग वाढविला. पुढे ती गतिरोधकांवर आदळली आणि शेवटी नियंत्रण सुटून झाडावर आदळली, अशी चर्चा घटनास्थळी आणि अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांमध्ये सुरू होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांनी मात्र याचा इन्कार केला. ते म्हणाले की, पोलिसांनी कोणत्याही मोटारीला थांबविले नाही. पाठलागाची केवळ अफवा आहे.सम्मेद, निनाद एकुलते एक मूळ राधानगरी तालुक्यातील सम्मेद निल्ले अभियांत्रिकी पदविकेचे (डिप्लोमा) शिक्षण पूर्ण करून पदवीचे शिक्षण घेत होता. सांगलीतच राहून तो एका दुचाकीच्या शोरूममध्ये नोकरीही करीत होता. त्याचे वडील शेतकरी असून, त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. निनाद आरवाडेनेही त्याच्यासोबतच लठ्ठे पॉलिटेक्निकमध्ये डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले होते. तो दिल्ली येथे नोकरीस होता. हे दोघेही आई, वडिलांना एकुलते एक होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने नातेवाइकांना मोठा धक्का बसला. विकी चव्हाण यानेही अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच्या वडिलांचे येथील यशवंतनगरमध्ये नाष्टा सेंटर आहे. त्याला एक लहान भाऊ आहे. विकीने पुण्यात बीबीएसाठी प्रवेश घेतला होता. शुक्रवारी तो पुण्याला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला. स्वप्न अधुरेच...राधानगरी : एकुलत्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने सोन्याची शिरोली (ता. राधानगरी) येथील निल्ले कुटुंबावर जणू आभाळच कोसळले आहे. शिक्षण घेत असलेल्या एका तरुणाचे अभियंता बनण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे. कार अपघातात जागीच मृत झालेल्यासम्मेद भारत निल्ले याच्या कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली आहे.विमा प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या भरत निल्ले यांचा सम्मेद हा एकुलता मुलगा होता. शांत, मनमिळावू व हुशार असलेला सम्मेद सांगलीतील एका नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. कामानिमित्त सांगलीत असलेला त्याचा चुलत भाऊ चैतन्य निल्ले व प्रतीक करगावे यांना अपघाताची माहिती पहाटे मिळाली. त्यांनी गावाकडे याची माहिती दिली. किरकोळ अपघात झाल्याचे सांगून त्याच्या आई-वडील व काही नातेवाईकांना तिकडे बोलवून घेतले. रुग्णालयातील सोपस्कार पूर्ण झाल्यावर सकाळी दहाच्या दरम्यान मृतदेह ताब्यात मिळाला. दुपारी दोन वाजता सोन्याची शिरोली येथे त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकुलत्या मुलाचा मृत्यू झाल्याने सम्मेदच्या आई, वडील व विवाहित असलेल्या दोन बहिणींनी केलेला आक्रोश पाहून हळहळ व्यक्त होत होती.मोटारीचा चक्काचूरअपघातग्रस्त मोटारीची पाठीमागील बाजू पूर्णपणे चेपली आहे. चालकाच्या बाजूचे पुढील टायरही फुटले आहेत. मोटार एवढ्या जोरात झाडावर आदळली की, झाडाची साल तळापासून वर सहा ते सात फुटांपर्यंत खरडून निघाली आहे. मोटार पाच ते सहा फूट उंच उडाली होती.