शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

साठे महामंडळ गैरव्यवहारप्रकरणी मुश्रीफ यांनी मागितली माफी

By admin | Published: August 11, 2015 10:41 PM

रमेश कदमांकडून पदाचा गैरवापर

कागल : मातंग समाजाच्या विकासासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने महामंडळ कार्यरत आहे. गोरगरीब आणि उपेक्षितांचे जिणे जगणाऱ्या मातंग समाजाचा आर्थिक विकास व्हावा म्हणून शासनानेही भरीव अर्थिक निधी या महामंडळासाठी दिला. मात्र, आमच्या पक्षाचे आमदार रमेश कदम यांनी या महामंडळाच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करीत गैरव्यवहार केले. त्याबद्दल समस्त मातंग समाजाची मी माफी मागतो, असे प्रतिपादन हसन मुश्रीफ यांनी केले.येथे हसन मुश्रीफ युवा शक्ती संघटनेच्यावतीने आयोजित मांतग समाज मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा संगीता गाडेकर, प्रा. शरद कांबळे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, संघटनेचे अध्यक्ष संजय हेगडे, दलित महासंघाचे बळवंतराव माने आदी उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, साठे महामंडळातील गैरव्यवहारचे प्रकार वाचून मी थक्क झालो. एवढा मोठा निधी जर मातंग समाजाला प्रामाणिकपणे मिळाला असता, तर कितीतरी कुंटुंबे अर्थिकदृष्ट्या सक्षम झाली असती. मातंग समाजाच्या विकासासाठी यापुढेही मी सदैव तत्पर राहणार आहे. प्रा. शरद कांबळे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी समाज व्यवस्थेबद्दलची कामगिरी, कष्टकऱ्या बद्दलची तळमळ आपल्या साहित्यातून मांडली. विश्वातील अनेक वैचारिक घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या या साहित्यातून दिसते, म्हणून ते विश्वरत्न आहेत.