शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

डोकीवरून ओझं वाहताना मज्जारज्जू बनला कमकुवत

By admin | Published: October 23, 2015 11:23 PM

बेलेवाडीच्या नंदू साळोखेची व्यथा : जगणं असह्य बनलं, जिद्दीच्या जोरावर लेखक बनला; पण..!

रवींद्र येसादे-- उत्तूर -कथा, कवितांचे लेखन करणं इतकं सोपं नाही. धडधाकट पण ये-जा करीत असताना डोक्यावरील ओझ्यानं हाय खाल्ली. बेलेवाडी (ता. आजरा) गावच्या उमद्या तरुणाच्या नशिबी अपंगत्व आलं. अपंगत्व येऊ नये, अशी म्हण आहे. मात्र, आपल्याला निसर्गाने हिरावून घेतले त्याच निसर्गाने निरीक्षण करून कथा, कविता लिहिणाऱ्या नंदू सखाराम साळोखे याला पाठबळाची गरज आहे.‘लुगडं’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्यानिमित्ताने नंदूच्या जीवनाचा सारिपाट उघडला. १ जानेवारी १९९८ चा दिवस त्याच्यासाठी काळरात्र म्हणून आला. शेताकडून डोक्यावरून ओझे घेऊन येणाऱ्या नंदूचा पाय घसरला तो कायमचा अपंगत्व घेऊनच.पाठीचा कणा ताठ राहायचा असेल, तर मज्जारज्जू तितकाच चांगला पाहिजे. मात्र, मज्जारज्जू कमकुवत बनल्याने नंदूच कमकुवत बनला. आभाळ फाटल्यासारखं मोठं संकट नंदूच्या कुटुंबावर कोसळलं. गिरणी कामगार म्हणून काम करणारे वडील हतबल झाले. नंदू आपल्या संवेदना हरवून बसला होता. शरीर लुळे-पांगळे बनले. जगणं मुश्कील होऊन बनले. आई-वडील, भाऊ, भावजय, मित्र परिवार यांनी मोठा धीर दिला; पण मज्जारज्जू कमकुवत असल्याने नीट उभाही राहू शकत नाही.मुंबईतही त्याच्यावर उपचार झाले. मात्र, उभा करण्याची ताकद डॉक्टर देऊ शकले नव्हते. १९९८ पासून या अपंगत्वावर मात करून आपले जीवन जगतोय. त्याच्याकडे निरीक्षण अफाट आहे. कविता करण्याची, लेखनाची आवड आहे. ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील यांच्या सान्निध्यातून त्याच्या लिखाणाला बळ मिळालं आणि तो लिहू लागला. कमरेपासून शरीर साथ देत नाही. पण, लिखाण सोडले नाही.निसर्गातील चौफेर घटनांची त्याला माहिती आहे. तो आपल्या लिखानात उतरतो. काव्य करण्याची कलाही अवगत आहे. मनमिळावू स्वभाव असल्याने नंदूचा मित्र परिवारही मोठा आहे. नंदूचा वेळ जावा यासाठी त्याला मित्रपरिवार वाचण्याचा खजिना पुरवितात. शारीरिक, नैसर्गिक क्रिया करताना नंदूला कसरत करावी लागते. आपल्या कथेच्या प्रकाशनावेळी नंदू आपला सारिपाट मांडत असताना व्यासपीठ गहिवरून गेले होते. भाऊ सागर धायमोकलून रडत होता. तरीपण जगणे सोडले नाही. निसर्गाने मला मोडलं या निसर्गावरच मात करीत जगणं सुरू असल्याचे सांगितले.लिखाणात खंड नाहीनंदूला ग्रामीण कथाकार शि. गो. पाटील, डॉ. संभाजी जगताप, प्रकाश केसरकर, सागर मिसाळ, संजय पोवार, भाऊ सागर साळोखे, आदी मंडळींच्या हातभार लाखमोलाचा आहे. यासर्व व्यक्ती दीपस्तंभाप्रमाणे उभ्या आहेत. त्याच्या लिखाणाची शृंखला कधी ही खंडित करू देत नाहीत, हे विशेष.उपचारासाठी लाखोंचा खर्चनंदू ज्यावेळी पडला त्यावेळी अनेक डॉक्टरांनी उपचार केले. घरची परिस्थिती हालाखिची बनली. मज्जारज्जू प्रत्यारोपण (स्टेमस्थेल थेरिपी) करून नंदूला नवीन जीवन देता येईल. मात्र, त्यासाठी पाच लाखांचा खर्च येतो. यातून रूग्ण ६० ते ७० टक्के बरा होतो. यासाठी सेवाभावी संस्थांनी नंदूसाठी मदत करण्याची गरज आहे.