कोल्हापूर : नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी १०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स आरोग्य विभागाला प्रदान करण्यात आली. सीपीआर रुग्णालयासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या त्यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नधान्यासह, औषधपाणी व वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा सातत्याने सुरूच आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात होत असलेल्या ऑक्सिजन टंचाईवर आमच्या परीने पर्याय म्हणून सीपीआरसाठी ३०, गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय २०, कागल कोविड केअर सेंटर २५, इचलकरंजीचे आयजीएम रुग्णालय २५, मुरगूड केंद्र पाच, उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्र पाच याप्रमाणे मशीन्स दिली आहेत.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माळी, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, प्रदेश सरचिटणीस राजेश लाटकर, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आदिल फरास, ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह भोसले, महेंद्र चव्हाण, दिनकर कोतेकर, राजेंद्र सुतार, अजिंक्य पाटील उपस्थित होते.
फोटो ओळी : नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनच्या वतीने शुक्रवारी सीपीआर रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आले. यावेळी महेंद्र चव्हाण, आदिल फरास, मंत्री हसन मुश्रीफ, आर. के. पोवार, नविद मुश्रीफ, राजेश लाटकर, प्रवीणसिंह भोसले, आदी उपस्थित होते. (फोटो-२१०५२०२१-कोल-मुश्रीफ फौंडेशन)