ज्योतीप्रसाद सावंत -- आजरा -आजरा साखर कारखाना निडणुकीच्या निमित्ताने राजकीय हालचाली प्रचंड गतिमान झाल्या असून, जयवंतराव शिंपी यांना सामावून घेऊन सत्तारूढ आघाडीची मोट बांधण्यासाठी आमदार हसन मुरीफ यांनी पुढाकार घेतला असून या सत्तारूढ सदस्यांची ‘समझोता’ गुढी उभारण्यात आमदार मुश्रीफ यांना यश मिळेल, असे राजकीय जाणकारांमधून समजते.आजरा साखर कारखाना संचालकांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याने निवडणुकीत हा संघर्ष उफाळून आल्यास कारखाना कारभाराचा पंचनामा होऊन एकमेकांवर चिखलफेक होण्याची शक्यता आहे. यामुळे याचे दुरगामी परिणाम कारखान्याच्या एकंदर वाटचालीवर होणार हे देखील स्पष्ट आहे.सद्य:स्थितीत राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस विरुद्ध अशोक चराटी आणि मित्र पक्ष असे चित्र प्राथमिक अवस्थेत दिसत आहे. समोर निवडणूक असली तरी प्रमुख नेतेमंडळी थोडीशी धास्तावलेली दिसत आहेत. अशोकअण्णा वगळता इतरांमध्ये फारशी आक्रमकता दिसत नाही. त्यामुळे नेमका हाच धागा पकडत आमदार मुश्रीफ यांनी अशोकअण्णांचे ‘बंड’ थोपविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीतील वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, उदय पवार, सुधीर देसाई, मुकुंदराव देसाई, अल्बर्ट डिसोझा ही मंडळी आमदार मुश्रीफ व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. जयवंतराव राष्ट्रवादीसोबत आहेत. राहिला प्रश्न तो अशोकअण्णा चराटी यांचा.अशोकअण्णा हे जरी मुश्रीफ यांच्या विरोधात वेळोवेळी थेट बोलत असले, तरी आमदार मुश्रीफ यांच्या शब्दाला मान देणारेही आहेत. मुश्रीफ यांनी जोर लावला तर अशोकअण्णा त्यांच्या शब्दाला निश्चितच मान देतील, अशी शक्यताही नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर अशोकअण्णा आणि मुश्रीफ यांच्यात बैठकही झाल्याचे समजते.अशोकअण्णांना विरोधी पॅनेल करण्यापासून रोखणे आणि जयवंतरावांना सन्मानपूर्वक संचालक मंडळात समाविष्ठ करून घेणे या दोन गोष्टी आमदार मुश्रीफ यांना साध्य झाल्यास निवडणुकीतील ‘हवाच’ निघून जाणार आहे आणि धक्का तंत्राचा वापर करणाऱ्या मुश्रीफ यांच्या दृष्टीने ही गोष्ट फारशी अवघड आहे असे सध्यातरी वाटत नाही. यातूनही उर्वरित मंडळींनी पॅनेल करून सत्तारूढ मंडळींच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतल्यास यामुळे फारसे काही घडेल, असे सध्या तरी वाटत नाही.नेते समाधानी होणार का ?अशोकअण्णा व जयवंतराव यांना संचालक मंडळात कितपत स्थान मिळणार. पुढील पाच वर्षांत चेअरमनपदी कुणा-कुणाला स्थान दिले जाणार ? जि.प. व पं. स. निवडणुकांमधील काही मुद्दे आताच स्पष्ट करावे लागणार आहेत.तर... भाजपा-स्वाभिमानी आघाडीतून बाहेरसत्तारूढ मंडळींमधून आमदार मुश्रीफ व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे ताणलेले संबंध पाहता भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे आणि प्रसंगी ‘स्वाभिमानी’लाही एखादी जागा घ्या अन्यथा आघाडीतून बाहेर होण्याजोगी परिस्थिती तयार केली जावू शकते.
मुश्रीफ उभारणार ‘समझोत्याची गुढी’?
By admin | Published: April 05, 2016 11:47 PM