बोरवडे : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागल मतदारसंघाचा कायापालट केला आहे. त्यांच्या प्रयत्नांतून विकासकामे सुरू नाहीत, असे मतदारसंघात एकही गाव नाही. म्हणूनच ते खरे विकासदूत असल्याचे प्रतिपादन बोरवडेचे सरपंच गणपतराव फराकटे यांनी केले.
बोरवडे (ता. कागल) येथील साठे माळ वस्तीमधील रेणुका मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहाचा पायाभरणी समारंभ सरपंच गणपतराव फराकटे यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सदस्य पं. स. सदस्य रघुनाथ कुंभार होते. यावेळी जि. प. सदस्य मनोज फराकटे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी सभागृहासाठी जमीन दिलेल्या साताप्पा खाडे व सीताराम खाडे यांचा सत्कार सरपंच गणपतराव फराकटे यांच्याहस्ते करण्यात आला.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या २५/१५ फंडातून या सभागृहासाठी पंधरा लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्याचा पायाभरणी समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. याशिवाय जि. प. सदस्य मनोज फराकटे यांच्या फंडातून ६.२५ लाख रुपये खर्चून गावच्या मुख्य चौकात उभारण्यात आलेल्या पाच हायमास्ट दिव्यांचे उद्घाटनही सरपंच गणपतराव फराकटे यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच मंगल साठे, माजी उपसरपंच तानाजी साठे, साताप्पा साठे, ग्रा. पं. सदस्य डॉ. रमेश चौगले, कृष्णात सूर्यवंशी, राजेंद्र जाधव, चंद्रकांत कुंभार, सदानंद कांबळे, विजय कदम, बबन धोंड, बाळासाहेब जाधव, राजाराम चव्हाण, पांडुरंग खाडे, दिनकर कुंभार, बाळासाहेब कुंभार, प्रकाश सूर्यवंशी, बाळासाहेब फराकटे, राजाराम साठे, मधुकर फराकटे, रंगराव साठे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळी - बोरवडे (ता. कागल) येथे रेणुका मंदिर सभागृहाचा पायाभरणी करताना सरपंच गणपतराव फराकटे, शेजारी रघुनाथ कुंभार, जि. प. सदस्य मनोज फराकटे व इतर.