लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोरोना संसर्गशी लढण्यासाठी मानवी प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून महाराष्ट्रातील पाच कोटी जनतेला आर्सेनिक अल्बम व आयुर्वेदिक औषधे मोफत देणार असल्याची माहिती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिली. ही औषधे खरेदीचे अधिकार ज्या - त्या जिल्हा परिषदांना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.ग्रामविकास विभागाने १३ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याज या निधीमधून राज्याच्या पातळीवरून ग्रामीण भागातील पाच कोटी लोकांना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम हे औषध फार चांगली कामगिरी करते, असे आयुष मंत्रालयाने शासन निर्णय घेऊन परिपत्रक काढले आहे. त्यामुळे ही औषधे खरेदी करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागानेही घेतला होता. विभागाने आर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीसाठी ज्यावेळी निविदा काढली; परंतु ज्या दरामध्ये औषध मिळणे आवश्यक होते, तो उद्देश सफल होऊ शकला नाही. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त समितीने उपरोक्त औषधे तत्काळ जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला आवश्यक त्याप्रमाणे कमीतकमी कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून खरेदी करावी. खरेदी खर्चाची रक्कम ज्या-त्या जिल्हा परिषदांना जमा करण्यात येईल. ही प्रक्रिया व वाटप तीन आठवड्यामध्ये पूर्ण करावे, असेही जिल्हा परिषदांना कळविण्यात आले आहे.
प्रतिकार शक्तीसाठी ग्रामीण पाच कोटी जनतेला औषधे मोफत देणार : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 10:43 AM
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्गशी लढण्यासाठी मानवी प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून महाराष्ट्रातील पाच कोटी जनतेला आर्सेनिक अल्बम ...
ठळक मुद्देप्रतिकार शक्तीसाठी ग्रामीण पाच कोटी जनतेला औषधे मोफत देणार खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदेकडे : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ