कोल्हापूर : सभासदांनी ज्या विश्वासाने ह्यगोकुळह्णची सत्ता आमच्या हातात दिली, त्यास पात्र राहून काम करायचे आहे. गोकुळचे संचालक म्हणून जी काही कल्पना डोक्यात असेल ती काढऊन टाकून दूध उत्पादकाच्या हिताचा कारभार करा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवनिर्वाचित संचालकांना दिला. गोकुळच्या वतीने त्वरीत ऑक्सीजन प्रकल्प उभा करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.गोकुळच्या नवनिर्वाचित संचालकांसह नेत्यांची बैठक शुक्रवारी डी. वाय. पाटील, मेडिकल कॉलेज मध्ये झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील संचालक मंडळाने रोज वीस लाख लिटर दूध संकालन गृहीत धरून शंभर कोटी खर्चून विस्तारवाढ केली. मात्र सध्या १३ ते १४ लाख लिटर दूध संकलन आहे. ते २० लाख लिटरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. काटकसरीचा कारभार करत दूध उत्पादकाच्या पदरात चार रूपये जादा देण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. सध्या गोकुळ देशात २७ व्या क्रमांकावर आहे, तो अमूलच्या बरोबरीने आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहील.पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, संकलन, प्रक्रिया व मार्केटींग या तीन टप्यापैकी प्रक्रिया व मार्केटींग मध्ये काटकसरीचे धोरण राहणार आहे. जाहीरनाम्यात दिलेल्या प्रत्येक वचनाची पुर्तता करण्याची जबाबदारी आमची आहे. ऑक्सीजन प्रकल्प उभा करत असताना कोविडचे संकट गेल्यानंतर तो उद्योगांना विकता येईल, त्यातून उत्पन्नात भर पडणार आहे. येण केण प्रकारे दूध उत्पादकाला दोन रूपये जादा देण्याचा प्रयत्न राहील.
संचालक पदाची डोक्यात हवा जाऊ देऊ नका, मुश्रीफ यांची नवनिर्वाचित संचालकांना सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 5:20 PM
Gokul Milk Kolhapur : सभासदांनी ज्या विश्वासाने ह्यगोकुळह्णची सत्ता आमच्या हातात दिली, त्यास पात्र राहून काम करायचे आहे. गोकुळचे संचालक म्हणून जी काही कल्पना डोक्यात असेल ती काढऊन टाकून दूध उत्पादकाच्या हिताचा कारभार करा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी नवनिर्वाचित संचालकांना दिला. गोकुळच्या वतीने त्वरीत ऑक्सीजन प्रकल्प उभा करावा, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
ठळक मुद्देसंचालक पदाची डोक्यात हवा जाऊ देऊ नका, मुश्रीफ यांची नवनिर्वाचित संचालकांना सल्लागोकुळने त्वरीत ऑक्सीजन प्लॅन्ट उभा करण्याची सतेज पाटील यांची सूचना