शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मुश्रीफ यांना ‘भाजप’ची आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:57 AM

गडहिंग्लज : राज्यात काँग्रेसची आघाडी पुन्हा सत्तेवर येणारच नाही, इतके काम आम्ही पाच वर्षांत नक्कीच केले आहे. मग तुम्ही ...

गडहिंग्लज : राज्यात काँग्रेसची आघाडी पुन्हा सत्तेवर येणारच नाही, इतके काम आम्ही पाच वर्षांत नक्कीच केले आहे. मग तुम्ही आणखी पाच वर्षे का वाया घालवता ? दोन्ही काँगे्रसच्या १० आमदारांची यादी तयार आहे. तुम्ही आलात तर अकरावे. सोलापुरात बोललो ते खरंच आहे. मी बोलतो ते करून दाखवतो, असा दावा करीत भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना येथे शुक्रवारी भाजप प्रवेशाची थेट आॅफर दिली.निमित्त होतं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत साकारण्यात आलेल्या गडहिंग्लज विभागातील सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाचे. ‘म्हाडा’चे अध्यक्ष व भाजपचे कागल मतदारसंघातील संभाव्य उमदेवार समरजित घाटगे यांच्यासमोरच त्यांनी मुश्रीफ यांना दिलेल्या ‘आवतना’मुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. नुसती आॅफर देऊनच मंत्री पाटील थांबले नाहीत. त्यांनी मुश्रीफ यांचे गुणगान गायिले. ते म्हणाले, मुश्रीफ हे अनुभवी आणि अल्पसंख्याक समाजातील मातब्बर नेते आहेत. गिरीश महाजन यांच्याप्रमाणे त्यांचेही वैद्यकीय क्षेत्रातील काम मोठे आहे. त्यांच्यासारखा सहृदयी माणूस उभ्या महाराष्ट्रात मी पाहिला नाही. काही झाले तरी पुन्हा भाजपचेच राज्य येणार आहे; त्यामुळे तुमची पुढची पाच वर्षे वाया जातील व तुमची सत्ता पुन्हा येईपर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल म्हणून भाजपमध्ये या.मंत्री पाटील यांच्या आॅफरबद्दल बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, मंत्री पाटील सोलापुरात कालबोलले. परंतु, मी त्यात नाही. माझ्यासारखा कर्तबगार मुस्लिम चेहरा ‘भाजप’मध्ये हवा म्हणून त्यांनीमला अत्यंत विनयाने सांगितलेहोते; परंतु, काही चांगले विरोधक राजकारणात हवेत. सगळी पृथ्वी नि:क्षत्रीय करू नका, असा सल्ला आपण त्यांना दिला आहे. मीत्यांना शुभेच्छा देऊ शकत नाही, कारण मी त्यांच्या उलट्या पक्षाचा आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दलमी त्यांचे मनापासून अभिनंदनकरतो. त्यांनी चांगले काम करावे. मुख्यमंत्री आमचा की तुमचा यावरून ‘भाजपा-शिवसेने’त जुगलबंदीसुरू आहे; परंतु, ‘आमचं दोघांचंठरलं आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी एकमेकांच्या हातात हात घालूनकाम करू आणि कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर वन होण्यासाठी प्रयत्न करू.चंदगडमध्येही ‘माळ’लोकसभा निवडणुकीत ‘म्हाडा’ व ‘सांगली’बाबत जे बोललो ते करून दाखविले; त्यामुळेच आमच्याकडे यायला इच्छुकांची माळ लागली आहे. तशीच माळ ‘चंदगड’मध्येही आहे. त्या सर्वांना एका माळेत बांधू, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाने नंदाताई बाभूळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले आहे.नशीब फळफळले...मंत्री पाटील यांच्या राशीत ‘राहू-केतू’ एकत्र आहेत. म्हणूनच त्यांचे नशीब फळफळले आहे. पाच वर्षांत एखाद्या राजकारण्याची किती प्रगती व्हावी, याचे ते उत्तम उदाहरण आहेत, अशी टिपणीही मुश्रीफ यांनी यावेळी केली.