शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मुश्रीफसाहेब, बांधकाम कामगारांना दम दिल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ, शिवाजी मगदूम यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 15:23 IST

मतदार संघातील एजंटगिरी संपविण्यासाठी साथ द्या

मुरगूड : लाल बावटा संघटनेने जेव्हा पालकमंत्र्यांना २०१९ मध्ये पाठिंबा दिला तेंव्हा त्यांना दहा हत्तींचे बळ मिळाले, अशा शब्दात कौतुक केले होते. आज आम्ही त्यांच्या विरोधातील समरजित घाटगे यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते सैरभैर होऊन कामगारांना लक्ष्य करत आहेत. मुश्रीफसाहेब, आमच्या कामगारांना दम दिल्यास जशास तसे उत्तर देऊ, असा सज्जड इशारा लाल बावटा संघटनेचे जिल्हा सचिव शिवाजी मगदूम यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिला.येथे लाल बावटा बांधकाम कामगार संघटना, ऊस तोडणी संघटना, किसान सभा तसेच शालेय पोषण आहार संघटनेतर्फे समरजित घाटगे यांना विजयी करण्यासाठी शहरातून रॅली काढून त्यांना पाठिंबा दिला. मगदूम म्हणाले, पालकमंत्री यांनी मागच्या दाराने दुसऱ्या पक्षाशी युती केल्यामुळे त्यांच्यावर अत्यंत वाईट वेळ आली. मागील विधानसभा निवडणुकीत बांधकाम कामगारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र त्या बदल्यात त्यांनी संघटना संपविण्याचाच प्रयत्न केला.

समरजित घाटगे म्हणाले, कामगारांच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी एक प्रभावशाली विचारधारा असायला हवी अशीच धारणा स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांची होती. पण सध्या कामगारांना शासकीय योजनांचा लाभ देताना लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जातात. एजंटगिरी आणि खंडणीखोर वृत्ती संपवण्यासाठी आम्हाला साथ द्या.प्रा. सुभाष जाधव, प्रकाश कुंभार, डॉ. प्रवीण जाधव, संदीप सुतार, राज कांबळे यांची भाषणे झाली. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विक्रम खतकर यांनी स्वागत केले. दिनकर जाधव यांनी आभार मानले.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्षभरमा कांबळे म्हणाले, पालकमंत्र्यांना पाठिंबा देऊनही त्यांनी आमची संघटना बेदखल केली. मागच्या दाराने पळून जाऊन त्यांनी केवळ स्वतःचेच भले केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सर्वच कामगार संघटनांनी समरजित घाटगे यांना विजयी करण्याचा निर्धार केला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kagal-acकागलSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024