शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

संगीत मंत्रशास्त्राचे

By admin | Published: June 10, 2015 12:16 AM

सिटी टॉक

आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने आवाज स्पंदनातून निर्माण होतो. विविध आवाज म्हणजे विविध ‘स्पंदन आविष्कार’. अद्वैत तत्त्वज्ञान, आण्विक शास्त्र तसेच आइनस्टाईन तत्त्वज्ञानास अनुसरून विश्व शक्ती सम्मुच्यय असून पृथ्वीवरील सर्व घटना विद्युत चुंबकीय आहेत. शास्त्रीय तत्त्वानुसार जिथे स्पंदणे तिथे आवाजाची उत्पत्ती. उलटपक्षी ज्या प्रकारचा आवाज त्यास अनुसरून विद्युतचुंबकीय लहरी स्पंदने निर्माण होतात. असे म्हणतात की, सृष्टीची निर्मिती ब्रम्हाच्या श्वास स्पंदनातून ओंकारातून झाली, त्यालाच वेदांचा आवाज म्हणतात. मनुष्य आणि इतर प्राण्यांचा विचार केल्यास प्रश्न पडतो, आरोग्य आणि भावना कशातून उद्भवतात. आपण श्वासोच्छ्वास करताना आपला श्वास नाडीतून, रक्तातून वाहतो तेव्हा स्पंदनलहरी तयार होतात आणि या लहरींच्या संतुलनावर आपले आरोग्य अवलंबून असते. ब्रम्हांडात नऊ प्रकारच्या लहरी नऊ गुणांमधून स्वत:चे अस्तित्व दाखवत असतात. नऊ लहरींच्या स्पंदनावर आपले सुख, शांती, समाधान अवलंबून असते. आपल्या नामकरणातदेखील विधात्याचा उद्देश असून बिजाक्षरे नऊ अंकावरील कोणत्या तरी अंकावर अवलंबून असतात. त्या बिजाक्षरावर आधारित त्या व्यक्तीची सुख- दु:खे अवलंबून असतात. बिजाक्षराला उपयुक्त ठरतील असे मंत्र ठरलेले आहेत. उदा. हनुमानाचा बिजाक्षर अंक नऊ असून त्यास नऊ अंकाचा मंत्र म्हणजे 'श्रीराम' होता. याचा अर्थ प्रत्येकाच्या बिजाक्षरानुसार त्यास उपयुक्त ठरणारे बीजमंत्र ठरलेले आहेत.आपल्या योगिक प्राणायामाद्वारे काही योगी आपल्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवू शकतात. त्यांचे आरोग्य आश्चर्यकारकरीत्या उच्च दर्जाचे असते. त्यांची रक्तवाहिनी कापली तरी रक्तस्त्राव होत नाही. काही योगी आपली नाडी आणि हदयाचे ठोके बंद ठेवून कित्येक तास एखाद्या अर्भकासारखे भूमीमध्ये गाडून घेऊ शकतात. श्वास शरीराइतकाच मनास महत्त्वाचा आहे. मन हे विचारांचे, प्राणीकशक्तीचे तसेच श्वासोच्छ्वासाचे स्रोत आहे. आरोग्यदायी, अनारोग्यदायी विचार हे नाडीच्या स्पंदनातून स्रवतात. संतसंगतीत तसेच रागलोभासारख्या भावनिक अवस्थेत आपला श्वास कमालीचा विविध असतो. कारण तो त्या वेळच्या नाडी स्पंदन अवस्थेवर अवलंबून असतो. भक्तिगीते, भावगीते, उत्सवावेळी आपली अवस्था आनंददायी असते. आपल्याला आवडणारे एखादे गाणे दुसऱ्याला आवडेल असे नाही. पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जसराज यांची शास्रीय गाणी समजायला तशी कानांची परिपक्वता हवी. संगीत तालांची कंपणे आपल्या ताल स्पंदनाशी जुळायला हवीत. आपण जेव्हा आनंदी असतो, तेव्हा आपल्या लक्षात येईल, की आपला श्वास उजव्या नाकपुडीतून वाहत असतो. जेव्हा आपण सुख, व्यवहारिक आनंद लुटत असतो, तेव्हा श्वास डाव्या नाकपुडीतून वाहत असतो. कारण सुख आणि दु:ख या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आनंद मात्र ईश्वरीय आहे. ध्यानस्थितीमध्ये आपला श्वास दोन्ही नाकपुड्यातून संतुलितपणे वाहत असतो. प्रत्येकाच्या मनस्थितीनुसार श्वास मंत्र जात असतो.काहीवेळा मन एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे कुठेही धावते, चावा घेते आणि अनारोग्य द्वंद्वास कारणीभूत होते. नैसर्गिक शक्ती जेव्हा अपकारक बनतात, मनाचे संतुलन बिघडते. तेव्हा ही शारीरिक अवस्था कोणत्या उपायांनी टाळता येईल का ? ही अपायकारकशक्ती अपकारकतेकडे बदलण्याची क्षमता असलेल्या अनेक उपायांपैकी वेदांनी सांगितलेला उपाय म्हणजे मंत्रशास्त्र.आपले मानसिक तसेच शारीरिक आरोग्य सुधारणारे अनेक राग रागदारीत आहेत. त्या दृष्टीने आरोग्य संगीत हा एक विशेष विषय आहे. होमिओपॅथिक तत्त्वज्ञानानुसार संगीतातील रागाचा एका व्यक्ती समूहावर होणारा मानसिक, भावनिक, शारीरिक परिणामांची नोंद करून ठेवल्यास त्या अवस्थेतील रुग्णास तो राग ऐकविल्यास त्याचे अनारोग्यावर चांगला परिणाम दिसून आला आहे. तीच गोष्ट मंत्राच्याबाबतीत होमिओपॅथिक संशोधनाचा भाग ठरू शकतो. वेदांना श्रुती म्हणतात. जे ऐकायला मिळते ते श्रुती. स्थोत्रा म्हणजे कान. मंत्राच्या उच्चारालादेखील अनन्यसाधारण महत्त्व असून मंत्राच्या उच्चाराच्या थोडाशा चुकीनेदेखील अनारोग्य संभवते. मंत्र शास्राने, संगीताने आरोग्य स्थापित होते. होमिओपॅथिकदेखील औषध स्पंदनलहरीचे शास्त्र आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताण हाताळायचे असतील तर स्वत:कडे धाव घ्यायला हवी. आपल्यावर होणारे सर्व परिणाम हे शेवटी आपल्यातूनच होत असतात. बाह्य व आंतरिक परिणामांचा आपल्या आंतरिक लहरीवर परिणाम होत असतो. शरीरातील लहरीची लयबद्धता साधण्यासाठी मंत्र, संगीत तसेच होमिओपॅथिक लहरी उपयुक्त ठरतात. - लेखक प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ आहेत.