शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

मुस्लिम समाजाने निभावले बंधुत्व

By admin | Published: October 16, 2016 12:06 AM

खांद्याला खांदा लावून सहभाग : शेकडो कार्यकर्त्यांमुळे सुलभ नियोजन

कोल्हापूर : सकल मराठा समाजाने काढलेल्या मोर्चास तब्बल ८५ विविध जातिधर्मांच्या संस्था-संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पायांना पाने बांधून जे कष्ट घेतले, त्याला तोड नाही. आपल्या घरात एखादे शुभकार्य असल्यावर जसे सारे कुटुंब राबते, अगदी तसाच मुस्लिम समाज या मोर्चासाठी राबला. त्यामुळे मोर्चा संपवून घरी निघालेल्या प्रत्येकाच्या तोंडात या धाकट्या भावाबद्दल अत्यंत कृतज्ञतेची भावना होती. या मोर्चामुळे मराठा समाजाचे प्रश्न तर सुटतीलच; परंतु त्याच्या निमित्ताने मराठा-मुस्लिम समाजांमध्ये जो बंधुत्वाचा धागा एकदम मजबूत झाला, तो जास्त मोलाचा आहे. कोल्हापूरची भूमी ही पुरोगामी आहे. राजर्षी शाहू महाराजांनी तिची जडणघडणच त्या विचारांनी केली आहे. त्यामुळे सगळ्या जातिधर्मांचे लोक या मोर्चासाठी पुढे सरसावले. मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला त्यामागे सगळ्यांत महत्त्वाचे हे एक कारण आहे. कोल्हापूरच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात एक गोष्ट प्रकर्षाने दिसून येते, ती म्हणजे देशात आणि राज्यात कुठेही धार्मिक तेढ निर्माण होऊन जातीय दंगे झाले तरी कोल्हापूरने कधीही मुस्लिम बांधवांच्या घरावर दगड भिरकावला नाही. तणाव जरूर असे; परंतु अशा काही प्रसंगांवेळी दोन्ही समाजांतील लोक एकत्र येऊन जातीय सलोखा कसा चांगला राहील यासाठी पुढाकार घेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी दंगलीचे निमित्त होऊन गोरगरीब मुस्लिम बांधवांचे काही माथेफिरूंनी नुकसान केले. त्यावेळी त्यांना आधार द्यायला हेच कोल्हापूर पुढे आले होते आणि हे फक्त कोल्हापुरातच घडत आले आहे. त्यामुळे मराठा समाजाचा मोर्चा निघतोय म्हटल्यावर मुस्लिम बांधवांना सेवा करण्याची संधी मिळाली. या समाजाने या सेवेने सकल मराठा समाजाच्या हृदयात स्थान मिळविले आहे. या सगळ्या कामात गणी आजरेकर, कादर मलबारी, इचलकरंजीचे सलीम कुरणे, सलीम अत्तार, तसेच वाईफ मुजावर, इरफान मुजावर, शकील नगारजी, हांजेखान सिंदी, हाजी इर्शाद टिनमेकर, जहॉँगीर मेस्त्री, नगरसेवक निलोफर मुजावर, आदींनी सहभाग घेतला. ४कोल्हापुरातील पार्किंगच्या ६५ ठिकाणी स्वत:चे स्वयंसेवक तैनात केले होते. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत मुस्लिम बांधव त्यासाठी चॉकपीठ टाकून नियोजन करीत होते व सकाळी सात वाजता तर ‘मराठा मावळा’ असा बिल्ला छातीवर लावून मैदानावर उतरले. हे नियोजन उत्तम झाल्यामुळेच मोर्चा संपल्यावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. शिरोळ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी चंगेजखान पठाण, शेख यांच्या नेतृत्वाखाली भडंग, केळी आणि पाण्याचे वाटप केले. इचलकरंजीतील हाजी कैस शौकत बागवान यांच्यासह कार्यकर्त्यांनी केळी, पाणी, सरबत यांचे वाटप केले. मुस्लिम बोर्डिंगने पोलिस, मावळे, पत्रकारांसाठी आठ हजार नाष्ट्याची पाकिटे वाटप केली. पाण्याचे सव्वासात लाख पाऊच वाटप केले. त्यातील पाच लाख पाऊच हे वारणा साखर कारखान्याच्यावतीने माजी मंत्री विनय कोरे यांनी दिले होते. लियाकत रंगरेज यांनी शिवाजी महाराजांचे चित्र असलेल्या दहा हजार पिशव्यांचे वाटप केले. स्वच्छतेच्या कामातही मुस्लिम महिलांनी योगदान दिले. बागवान गल्लीने सरबत वाटप केले. कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीने चार ठिकाणी एक हजार किलो तांदळाचा पुलाव करून वाटला.