कोल्हापूर : चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहेत. बुधवारी झालेल्या मगरीब नमाजानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या हिलाल कमिटी (चांद कमिटी)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.मौलाना मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैेठकीत मुंबई, बंगलोर, लखनौ, दिल्ली, देवबंद, रत्नागिरी, रायगड ,इंडी, तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. या ठिकाणांहून चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्याने तरावीहची नमाज पठण आज, गुरुवारी, तर उद्या शुक्रवारपासून रोजे सुरू होत असल्याचा निर्णय उलमा कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केला.यावेळी मौलाना इरफान कासमी, नाझिम पठाण, अब्दुल रऊफ नाईकवडे, अब्दुलसलाम कासमी, जाफर बाबा सय्यद, मुफ्ती ताहीर बागवान, वाहिद सिद्दिकी, मुफ्ती खुर्शीद कासमी, राहमतुल्ला कोकणे, हाफिज समीर, मुक्ती इस्माईल अन्सारी, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, पापाभाई बागवान, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड व कोल्हापूर शहर व उपनगरांतील सर्व मसजिदचे पेशइमाम, मुस्लिम बोर्डिंगचे सर्व पदाधिकारी संचालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
रमजान रोजांचे वेळापत्रकरमजान रोजे काळातील सहेरी आणि इफ्तारचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-दिनांक - सहेरीची वेळ (पहाटे) - इफ्तारीची वेळ (सायंकाळी)२४ मार्च - ५ वाजून १३ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२५ मार्च - ५ वाजून १२ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२६ मार्च - ५ वाजून ११ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२७ मार्च - ५ वाजून १० मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२८ मार्च - ५ वाजून ९ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२९ मार्च - ५ वाजून ८ मिनिटे - ६ वाजून ४९ मिनिटे३० मार्च - ५ वाजून ८ मिनिटे- ६ वाजून ४९ मिनिटे३१ मार्च - ५ वाजून ७ मिनिटे- ६ वाजून ४९ मिनिटे१ एप्रिल- ५ वाजून ६ मिनिटे - ६ वाजून ४९ मिनिटे२ एप्रिल- ५ वाजून ५ मिनिटे - ६ वाजून ४९ मिनिटे३ एप्रिल- ५ वाजून ४ मिनिटे - ६ वाजून ५० मिनिटे४ एप्रिल- ५ वाजून ३ मिनिटे - ६ वाजून ५० मिनिटे५ एप्रिल- ५ वाजून २ मिनिटे - ६ वाजून ५० मिनिटे६ एप्रिल- ५ वाजून २ मिनिटे - ६ वाजून ५० मिविटे७ एप्रिल- ५ वाजून १ मिनिट - ६ वाजून ५० मिनिटे८ एप्रिल- ५ वाजता - ६ वाजून ५० मिनिटे९ एप्रिल- ४ वाजून ५९ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१० एप्रिल- ४ वाजून ५८ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे११ एप्रिल- ४ वाजून ५७ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१२ एप्रिल- ४ वाजून ५७ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१३ एप्रिल- ४ वाजून ५६ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१४ एप्रिल - ४ वाजून ५५ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१५ एप्रिल- ४ वाजून ५४ मिनिटे - ६ वाजून ५२ मिनिटे१६ एप्रिल- ४ वाजून ५३ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे१७ एप्रिल- ४ वाजून ५२ मिनिटे - ६ वाजून ५२ मिनिटे१८ एप्रिल- ४ वाजून ५२ मिनिटे - ६ वाजून ५२ मिनिटे१९ एप्रिल- ४ वाजून ५१ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे२० एप्रिल- ४ वाजून ५० मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे२१ एप्रिल - ४ वाजून ४९ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे२२ एप्रिल - ४ वाजून ४९ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे