कोल्हापूर येथील अस्टीग्मा होप क्लिनिकच्या शाखेचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त डॉ. कळेकर बोलत होते. या वेळी धन्वंतरी पूजन करून अस्टीग्मा होप क्लिनिक वंध्यत्वाच्या पहिल्या रुग्ण अंजली गुरव यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
तसेच कोल्हापूर शहरातील व परिसरातील अस्टीग्मा होप क्लिनिकच्या उपचारांनी वंध्यत्वावर मात करून संतती लाभ झालेल्या अनेक जोडप्यांना या वेळी भेटवस्तू व मिठाई देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी अनेक माता-पित्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. वंध्यत्व निवारण करताना किती अडचणी आल्या. समाजाकडून, कुटुंबीयांकडून किती त्रास, अवहेलना झाली, याचे वर्णन करताना अनेकांना अश्रू अनावर झाले. पण डॉ. उमेश कळेकर यांच्या उपचारांनी जीवनात आशेचा किरण आल्याने मातृ-पितृत्व लाभल्याची कृतज्ञतेची भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.
फोटो - १४०६२०२१-जेएवाय-०३-डॉ. उमेश कळेकर