शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

संभाजीराजेंवरील पक्षीय आक्षेपांना फडणवीसांचे परस्पर उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 10:48 AM

Devendra Fadnavis Sambhaji Raje Chhatrapati kolhapur- संभाजीराजे यांना भाजपने खासदारकी दिली. मात्र, त्यांचा पक्षाला काय उपयोग, असा थेट सवाल उपस्थित करणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी न्यू पॅलेसवर हजेरी लावून परस्पर उत्तर दिल्याचे मानले जाते. त्यामुळे या दोघांचे संबंध असेच सलोख्याचे राहिले तर संभाजीराजेंना खासदारकीची दुसरी टर्म अवघड नसल्याचेही मानले जाते.

ठळक मुद्देसंभाजीराजेंवरील पक्षीय आक्षेपांना फडणवीसांचे परस्पर उत्तर न्यू पॅलेसवरील उपस्थितीने भाजपमधीलच अनेकांच्या उंचावल्या भुवया

समीर देशपांडेकोल्हापूर : संभाजीराजे यांना भाजपने खासदारकी दिली. मात्र, त्यांचा पक्षाला काय उपयोग, असा थेट सवाल उपस्थित करणाऱ्या नेते, कार्यकर्त्यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी न्यू पॅलेसवर हजेरी लावून परस्पर उत्तर दिल्याचे मानले जाते. त्यामुळे या दोघांचे संबंध असेच सलोख्याचे राहिले तर संभाजीराजेंना खासदारकीची दुसरी टर्म अवघड नसल्याचेही मानले जाते.फडणवीस यांनी अतिशय व्यस्त वेळातून गुरूवारी कोल्हापूरमध्ये येत संभाजीराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केवळ एका तासासाठी ते संभाजीराजे यांच्यासाठी कोल्हापुरात आले होते. यातूनच त्यांनी संभाजीराजे यांच्याविषयीच्या आपल्या भावना स्पष्ट केल्या आहेत.सुरूवातीला किल्ले संवर्धन, नंतर राज्याभिषेकारोहण आणि गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणासाठी जनजागरण या त्रिसुत्रीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर फिरणारे संभाजीराजे यांना दहा वर्षांपूर्वी लोकसभेला राष्ट्रवादीची उमेदवारी असतानाही कोल्हापुरात पराभव स्वीकारावा लागला होता. संसदेच्या माध्यमातून मोठं काम उभं करण्याची संभाजीराजे यांची महत्त्वाकांक्षा भाजपने वास्तवात आणली आणि संभाजीराजे राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले. यासाठी फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.जरी संभाजीराजे हे भाजपकडून खासदार असले तरीही त्यांनी भाजपच्या पक्षीय राजकारणामध्ये फारसा रस घेतलेला नाही. याउलट ते भाजपपासून सुरक्षित अंतर ठेवून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत समन्वयाच्या भूमिकेत दिसत आहेत. हाच मुद्दा भाजपच्या मुंबईत काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत काही नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, आता येथे या विषयावर चर्चा नको, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले होते.अन् फडणवीस यांचा दौरा ठरलासंभाजीराजे यांच्या वाढदिवसासाठी येण्याचा फडणवीस यांचा निर्णय अगदी ऐनवेळी झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे बुधवारी जेव्हा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना हा निरोप मिळाला तेव्हा अनेकांना फडणवीस केवळ संभाजीराजेंना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत, याचे आश्चर्य वाटले. मात्र, संभाजीराजे पक्षीय कामात नसतात, असा आक्षेप घेणाऱ्यांना फडणवीस यांनी परस्पर उत्तर दिले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूर