शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

माझे कर्तव्यनिष्ठ आजोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2021 4:23 AM

माझे आजोबा डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना आपल्यातून कायमचे जाऊन सहा वर्षे पूर्ण झाली. १ एप्रिल २०१५ ...

माझे आजोबा डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांना आपल्यातून कायमचे जाऊन सहा वर्षे पूर्ण झाली. १ एप्रिल २०१५ हा दिवस आमच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद दिवस ठरला. ज्या माणसाच्या अंगाखांद्यावर आपण खेळलो, ज्याने आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या, लाडात वाढविले, तळहातावरील फोडाप्रमाणे जपले तो माणूस आपल्या आयुष्यात कायमचा नसणे म्हणजे किती दु:खदायक आहे आणि ते आपले लाडके असेल तर मग बघायलाच नको.

माणूस मरताना काही घेऊन जात नाही; पण त्यांचे कर्तृत्व त्यांनी केलेली चांगली कामे, अडचणीच्या वेळी माणसाला केलेली मदत मात्र त्या माणसाच्या मरणानंतरही सगळ्यांच्या लक्षात कायमची राहते. त्यांचे चांगले विचार आणि वसा जपला जातो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आणि क्षण सार्थकी लावणारे माझे आजोबा असेच प्रत्येकाच्या मनात कायमचे घर करून राहिले आहेत. त्यांच्या आदर्श विचारांनी ते अजून आपल्या मनात कायम जिवंत आहेत. माणूस स्वत:साठी सगळे करताना पण इतरांसाठी झिजणे, त्यांना मदत करणे यातच खरा मनाचा मोठेपणा आहे.

त्यांनी काढलेल्या संस्थेला ते जिवंत असेपर्यंत स्वत:चे नाव दिले नाही. लोकांनी आग्रह केला तरी त्याला स्पष्ट नकार दिला. आपल्या मतावर ते कायम ठाम राहिले. त्यांच्या पश्चात त्या संस्थांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. आम्हालाही या गोष्टीचा अभिमान आहे. प्रत्येक संस्थेतील कामगार, सभासद यांना आजोबांनी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली. प्रत्येकाला आपुलकीने, मायेने आपलेसे करून माणसे जोडली. ही नाती त्यांनी शेवटपर्यंत जपली.

शेती हा त्यांचा आत्मा होता. शेतीच्या प्रगतीबद्दल ते भरभरून बोलत. शेतात नवनवीन प्रयोग करीत असत. ती आवड त्यांनी माझे पप्पा गणपतराव अप्पासाहेब पाटील यांच्यात रुजवली. शेती कशी करावी हे फोंड्या माळावर फुललेल्या श्रीवर्धन बायोटेककडे बघितल्यावर लक्षात येईल. त्यासाठी पप्पांनी किती कष्ट घेतले असतील आणि त्यांना आजोबांनी किती साथ दिली याचे उत्तर सापडेल. शेतीला आई मानणाराच शेती चांगल्या रीतीने फुलवू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

आजोबांनी वाचन, नाटक, सिनेमा हे छंद आपल्या कामाच्या व्यापातूनही जोपासले होते. त्यांचे वाचन अफाट होते. पुस्तकातील चांगली व मार्मिक वाक्ये त्यांच्या आठवणीत राहत असत. त्यांनी कधी स्वत:साठी घेतला नाही; पण, सगळ्यांचे फोन नंबर त्यांच्या तोंडपाठ होते. यावरून त्यांची स्मरणशक्ती किती अफाट होती हे लक्षात येईल. भावगीत, नाट्यसंगीत त्यांना फार आवडायचे. आजोबा जेव्हा गाणी गुणगुणत असत त्यावेळी आम्ही ओळखत की, आज आजोबांचा मूड चांगला आहे. या सगळ्या व्यापातूनही आजोबांनी कुटुंबासाठी वेळ देणे ही काही साधी गोष्ट नाही; पण त्यांनी कुटुंबाची पण तेवढीच काळजी घेतली. कुटुंबातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या भावना समजून घेतल्या. त्यांची मन व इच्छा जपण्याचा कसोशीने आणि मनापासून प्रयत्न केला. म्हणूनच ते आपल्या कुटुंबाला एकसंध ठेवण्यात यशस्वी झाले. आमचे कुटुंब अजूनही एकसंध आहे आणि शेवटपर्यंत राहणार हीच आमच्या आजोबा आणि आई, पप्पांनी आम्हा कुटुंबाला दिलेली उत्तम विचाराची आणि संस्काराची शिदोरी आहे. कोणतेही काम करताना डगमगून जायचं नाही. प्रत्येक संकटावर यशस्वीपणे मात करायची, ही शिकवण आजोबांनी आमच्यात रुजवली आहे. आजोबांच्या या शिकवणीमुळे आम्ही आणि आमची पुढची पिढीपण सक्षम आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनली आहे. त्यांनी आपण स्वत: केलेल्या कामाचा कधी उच्चारही केला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळी आम्हाला माणसे भेटायला येत होती, त्यांच्याकडून आम्हाला कळले की, आजोबांनी लोकांसाठी किती केले. ते सांगत की, साहेबांनी आमच्यासाठी किती मदत केली. अडचणीच्या वेळी कसे उपयोगी पडले, हे सगळे ऐकून मन हेलावून जात. त्यामुळे आजोबांविषयी आदर आमच्या मनात अधिकच वाढला आहे. केलेल्या कामाची वाच्यता न करता येणारे काम करीत राहायचे यासाठी मन किती मोठे लागते, हे त्यावेळी आम्हाला कळले. आम्ही कुटुंबीय खरच भाग्यवान आहोत. कारण नि:स्वार्थी आणि प्रेमळ आजोबा एक कुटुंबप्रमुख आम्हाला मिळाले. त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच अवघड आहे. एवढे त्यांचे कर्तृत्व विशाल आहे. अशा माझ्या आजोबांना कोटी कोटी प्रणाम! - अस्मिता रमेश पाटील

फोटो - ३१०३२०२१-जेएवाय-०५-सा. रे. पाटील