शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

माझी भूमिका ‘स्ट्रिक्ट फादर’चीच!

By admin | Published: August 04, 2016 12:28 AM

विश्वास नांगरे-पाटील : गुंडांचा ‘कार्यक्रम’ करणार; नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळणार

सांगली : पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे, यासाठी मी सदैव आग्रही आहे. पोलिस कर्मचाऱ्यांवरील ताण-तणावामुळे काहीवेळा वादविवाद होत असतात. तेही माझे बांधवच आहेत. हे वातावरण बदलण्यासाठी काहीकाळ लागेल. आपण ‘स्ट्रिक्ट फादर’ची भूमिका निभावणार असून, ‘स्पेट मदर’ होणार नाही, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केले. विश्वास नांगरे-पाटील गेले दोन दिवस सांगली दौऱ्यावर आले आहेत. बुधवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नागरिकांत पोलिसांबद्दल विश्वासार्हता निर्माण करण्यावर आपला भर आहे. तक्रारदार पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याला कशी वागणूक मिळते, यावर आमचे लक्ष असेल. त्यासाठी नियंत्रण कक्षात स्वतंत्र यंत्रणा उभी करणार आहोत. दिवसभरात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल होणाऱ्या तक्रारींची माहिती घेऊन संबंधित तक्रारदाराला नियंत्रण कक्षातून दूरध्वनी जाईल. त्याला पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्याची तक्रार दाखल करून घेताना त्रास दिला का? पैशाची मागणी झाली का? तक्रारीची प्रत मिळाली का? असे तीन प्रश्न विचारले जातील. यापुढील काळात गुंडांवर पोलिसांची दहशत बसलीच पाहिजे, अशा पध्दतीने पोलिसिंंग झाले पाहिजे आणि तेच आम्ही यापुढील काळात करणार आहोत. जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखायची असेल तर, समाजविघातक कारवाई करणारे आणि गुंडागर्दी करणाऱ्यांविरोधात हद्दपारीचे प्रस्ताव तातडीने तयार केले गेले पाहिजेत. या जिल्ह्यातून जवळपास ३०० जणांना हद्दपार केले पाहिजे आणि तसे प्रस्ताव तयार करावेत, असे आदेश त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. अनेक प्रकरणांत खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. त्याविरोधातही खंबीरपणे धोरण राबविणार आहोत. (प्रतिनिधी)हायवे बीट निर्माण करणार...महामार्गावर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्याशिवाय दुभाजक फोडणे, विनाहेल्मेट प्रवास, ड्रिंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह असे प्रकार सर्रास होतात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी हायवे बीट हे स्वतंत्र पथकच तयार करणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले.