शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

नाबार्ड देणार पाणी बचतीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:32 AM

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणी मुबलक असले तरी काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी पाणी बचतीकडे वळले पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी ठिबक ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता माने यांनी केले.‘नाबार्ड’च्यावतीने पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानाचा प्रारंभ सोमवारी जिल्हा बॅँकेत करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माने म्हणाल्या, जिल्हा ...

कोल्हापूर : जिल्ह्यात पाणी मुबलक असले तरी काळाची पावले ओळखून शेतकऱ्यांनी पाणी बचतीकडे वळले पाहिजे. उत्पादकता वाढीसाठी ठिबक ही काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा बॅँकेच्या ज्येष्ठ संचालिका, माजी खासदार निवेदिता माने यांनी केले.‘नाबार्ड’च्यावतीने पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानाचा प्रारंभ सोमवारी जिल्हा बॅँकेत करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. माने म्हणाल्या, जिल्हा बॅँकेने शेतकºयांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या आहेत. ‘नाबार्ड’ने योजनांचा केवळ प्रसार न करता शेतकºयांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘नाबार्ड’चे सहायक महाप्रबंधक नंदू नाईक म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात ९४ टक्के शेतकरी पाच एकरांच्या आतील आहेत. त्यामुळे उत्पादकता वाढली तरच शेती किफायतशीर होऊ शकते. उत्पादकता वाढीसाठी ठिबकची गरज असून, ‘नाबार्ड’ने त्यासाठी जनजागृती अभियान सुरू केले आहे. पाच तालुक्यांतील शंभर गावांमध्ये जाऊन जैन इरिगेशन व दृष्टी ग्राम कृषी विकास संस्थेचे पदाधिकारी शेतकºयांमध्ये प्रबोधन करतील.यावेळी जैन इरिगेशनचे उद्धव पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने, आसिफ फरास, उदयानी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. पाण्याचा कार्यक्षम वापर अभियान व्हॅनचा प्रारंभ निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार, बॅँकेचे संचालक अनिल पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजीव आवळे, सर्जेराव पाटील-पेरीडकर, आर. के. पोवार, विलास गाताडे, विविध गावांतील सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यवस्थापक जी. एस. शिंदे यांनी आभार मानले.ठिबक कर्जावरील व्याज आवाक्याबाहेरजिल्ह्यातील पहिले शंभर टक्के ठिबक राबविणारे कारभारवाडी (ता. करवीर) येथील शेतकरी साळोखे म्हणाले, ठिबकमुळे एकरी ४०-५० टन उसाचे उत्पादन मिळते; पण ठिबकसाठी काढलेल्या कर्जाचा व्याजदर परवडत नाही. त्यासाठी ‘नाबार्ड’ने मदत केल्यास ठिबकचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल.रुकडीचा खडकाळ माळ फुलला!रयत शिक्षण संस्थेने जैन इरिगेशनच्या मदतीने रुकडी येथील खडकाळ माळ फुलविला आहे. शंभर एकरांत ऊस, सोयाबीनसह फळांच्या बागा डोलू लागल्या असून, ठिबकची शेती किफायतशीर कशी, याचे उत्तम उदाहरण आहे. लवकरच याचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.