कोल्हापूर, दि. ७ : हातगाव कांबी (जि. अहमदनगर) येथील नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया संभाजी भराट (पाटील) याला कठोर शिक्षा व्हावी, याकरिता नाभिक समाजाने गुरुवारी करवीर आणि पन्हाळा तालुक्यात निदर्शने केली.महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने गुरुवारी करवीर तहसील कार्यालयासमोर तर, पन्हाळा शाखेतर्फे पन्हाळा येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.याबद्दल करवीरचे नायब तहसीलदार संतोष सानप यांना तर पन्हाळ्याचे नायब तहसीलदार रामचंद्र चौबे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. यात अहमदनगर येथील संशयित संभाजी भराट याला कठोर शिक्षा व्हावी, यासह मुलीला योग्य न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी महामंडळाच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये निदर्शने व जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून करवीर आणि पन्हाळा येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तर संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी महामंडळाचे राज्य उपाध्यक्ष एम. आर. टिपुगडे, विभागीय अध्यक्ष मारुती टिपुगडे, जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार, कार्याध्यक्ष अनिल संकपाळ, बाबासाहेब काशीद, दिनकर चव्हाण, दीपक माने, अनिल मांडरेकर, नरेंद्र माने, सुकुमार चौगुले, शिवाजी माने, बाळासाहेब साळोखे, किरण कोरे, विनायक माने, विलास खेडकर, संदीप संकपाळ, शिवाजी जाधव, सुनील माने, सरदार माने, अशोक सडोलीकर, श्रीकांत बेले, किशोर खराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
पन्हाळा तालुक्यात मूक मोर्चा
पन्हाळा तालुक्यातील नाभिक बांधव सकाळी दहा वाजता शिवा काशीद सामाधी स्थळी जमले. त्यावेळी शोक सभा घेवून निषेध करून पुढील धोरण ठरवण्यात आले. त्यावेळी मूक मोर्च्यात रुपांतर झाले. प्रांत कार्यालय येथिल चौकातून तहसिल कार्यालया कडे मोर्चा रवाना झाला. शिस्तबद्ध पद्धतीने पन्हाळा तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या शिष्ट मंडळाने तहसिलदार रामचंद्र चोबे यांच्या कडे निवेदन सादर केले. पन्हाळा तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गाऱ्हाणे मांडली.
पन्हाळा नाभिक महा मंडळाचे अध्यक्ष सदशिव सूर्यवंशी, उप-अध्यक्ष भीमराव शिंदे, जिल्हा चिटणीस सरदार झेंडे, कार्य अध्यक्ष शिवाजी लोखंडे यांनी हा खटला जलद गतीने चालवावा अशी भूमिका मांडली. तहसिलदार रामचंद्र चोबे यांनी या बाबत कडक कारवाई करण्यात यावी अशी वरिष्ठांकडे कळवू असे आश्वासन दिले.
यावेळी दि.११रोजी पन्हाळा तालुक्यातील सर्व नाभिक बांधवांनी सलून दुकाने बंद ठेवून अहमदनगर ला आंदोलनासाठी जाण्याचा निर्णय घेतला. शहर अध्यक्ष रविंद्र काशीद यांनी इतर तालक्यातील नाभिक बांधवांनी दि.११रोजी सलून दुकाने बंद ठेवून अहमदनगरला जाण्याचे आवाहन केले.
जयंत जाधव, नामदेव पोवार, विशाल सूर्यवंशी, सुहास जाधव,परशुराम खुटाळे, पांडूरंग संकपाळ, संदिप इंगळे,अर्जुन संकपाळ, अंकुश रोकडे, दिपक पोवार, सुधीर संकपाळ, रविंद्र सूर्यवंशी, दगडू काशीद, कृष्णात सूर्यवंशी यांच्यासह तीनशे हून आधीक लोकांच्या सह्या आहेत. यावेळी पन्हाळा पोलीस पाटील भीमराव काशिद, कोलोली पोलीस पाटील शुभांगी जाधव उपस्थित होते.